(फलटण/ प्रतिनिधी )शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय , फलटण आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे भिलकटी येथे मंगळवार , दिनांक 30 डिसेंबर,2025 रोजीआयोजित कार्यक्रमात प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर ” राष्ट्रनिर्मितीतील युवकांचे योगदान ” विषयावर बोलत होते . ते पुढे म्हणाले की,
“युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती ” कारण आजची युवा पिढी म्हणजे देशाचा भविष्यकाळ आणि आधारस्तंभ आहे. एक सक्षम आणि सजग युवा पिढीच देशाचे उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकतात. राष्ट्राचा विकास आणि समाजाचे कल्याण हेच ध्येय युवकांनी ठेवून आपल्या कार्याला दिशा दिली तर भारत निश्चित महासत्ता व प्रगत राष्ट्र बनेल. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील युवशक्तीचा लढा, त्याग, संतांचे , समाजसुधारकांचे, संशोधक, शास्त्रज्ञांचे स्फूर्तिदायी योगदान यावर भाष्य केले.
युवकांनी अर्थव्यवस्था , उद्योजकता, शिक्षण, लोकशाही, कृषी, सेवा क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान व संशोधनातील भूमिका समजून घेतली पाहिजे. डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांनी ” भारत – 2020″ स्वप्न फक्त आणि फक्त युवकांच्या प्रतिभा व कर्तृत्वावर विश्वास ठेवून पाहिले होते . विकसित भारत 2047 कडे यशस्वी वाटचाल करून आपला देश विकसित करायचा असेल तर राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे मत व्यक्त केले.शेवटी “मी भारताचा तरुण नागरिक माझे कर्तव्य “ही प्रतिज्ञा घेऊन व्याख्यानाची सांगता केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत शेट्ये यांनी तर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम अधिकारी प्रा. फिरोज शेख व डॉ. दिपाली कांबळे यांनी केला.प्रा. शंभूराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्तिथांचे आभार मानले . अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक जाधव , प्रा. डॉ. जयसिंग सावंत ,प्रा. विशाल गायकवाड तसेच जेष्ठ पत्रकार मुगुटराव कदम यांची प्रमुख उपस्तिथी होती .