आपला जिल्हा

गुणवरे जिल्हा परिषद गटातुन सौ.ऋतुजा अभिजीत जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक

(आनंद पवार /प्रतिनिधी )सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले असून गुणवरे जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोखळी गावच्या मा. उपसरपंच अभिजीत सुरेश जगताप यांच्या पत्नी सौ. ऋतुजा अभिजीत जगताप यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी दर्शवली आहे.

सौ. ऋतुजा जगताप यांनी स्पष्ट केले की, “महायुतीचे नेतृत्व जर संधी देईल, तर गुणवरे जिल्हा परिषद गट पूर्ण ताकदीने लढवणार असून विकासकामांचा धडाका लावण्यात येईल.”सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या जगताप कुटुंबाचा परिसरात मजबूत जनसंपर्क असून, सौ. ऋतुजा यांचे सासरे श्री. सुरेश संभाजी जगताप हे हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोखळी चे व्हाईस चेअरमन आहेत.

त्यांचे पती श्री. अभिजीत जगताप हे फलटण पूर्व भागातील युवा नेते श्री. मनोज तात्या गावडे यांचे कट्टर समर्थक असून, उपसरपंच पदावर असताना त्यांनी गोखळी गावात विविध विकासकामे केली आहेत.

राजकीय वारसा, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची इच्छा या जोरावर सौ. ऋतुजा जगताप यांची उमेदवारी गोखळी व गुणवरे गट परिसरातून जोरदार मागणीला आली आहे.गोखळी गावचे माजी सरपंच मनोज तात्या गावडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करणारे कट्टर समर्थक म्हणून अभिजीत जगताप यांची ओळख आहे त्यांच्या पत्नी ऋतुजा जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी गुणवरे जिल्हा परिषद गटातून होत आहे.

ऋतुजा जगताप या स्थानिक असून त्यांना असणाऱ्या अडीअडचणींबाबत माहिती आहे त्यांना भविष्यात संधी दिल्यास त्या संधीचं नक्कीच सोन होईल अशी चर्चाही जाणकारातून होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!