ताज्या घडामोडी

कालकथित नामदेव भागोजी अडसूळ यांच्या अस्थि संकलनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

(बारामती : प्रतिनिधी ) कालकथित (ता. बारामती) येथे दिवंगत नामदेव भागोजी अडसूळ (वय ९३ वर्षे) यांच्या अस्थि संकलनाचा कार्यक्रम सामाजिक, वैज्ञानिक व पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने संपन्न झाला.

अडसूळ कुटुंबीयांच्या वतीने पाण्यात अस्थी प्रवाहात न सोडता त्या खड्ड्यात विधीपूर्वक टाकून, त्यावर कालकथित नामदेव भागोजी अडसूळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण रक्षण व निसर्गसंवर्धनाचा प्रभावी संदेश समाजास देण्यात आला.

हा समाजप्रबोधनात्मक उपक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका यांच्या पुढाकाराने पार पडला. कार्यक्रमास बौद्धाचार्य आयु. सोमनाथ विश्वनाथ लोंढे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष व बौद्धाचार्य आयुष्यमान महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

आयु.सोमनाथ विश्वनाथ लोंढे यांनी अस्थि संकलन व पुण्यानुमोदन विधींचे संचलन केले. यावेळी फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी आपल्या मार्गदर्शनातून पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

हा उपक्रम पारंपरिक प्रथांना नवा अर्थ देणारा असून, श्रद्धा आणि निसर्ग यांचा समतोल साधणारा आदर्श उपक्रम म्हणून समाजात कौतुकास पात्र ठरत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!