आपला जिल्हा

मा.नगराध्यक्ष सोमशेठ जाधव आणि मा.नगरसेवक विक्रम जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (अजित पवार) गटात जाहीर प्रवेश

(फलटण/प्रतिनिधी ) निवडणुकीच्या आखाड्यात काही दिवस बाकी असुन फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात एक मोठा बदल झाला आहे. फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव आणि माजी नगरसेवक विक्रम जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (अजित पवार गट) जाहीर प्रवेश केला.

यावेळी आमदार सचिन पाटील, फलटण तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य माजी सभापती पंचायत समिती फलटण रामभाऊ ढेकळे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

प्रभाग क्रमांक १ मधील सोमवार पेठेत सोमशेठ जाधव यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमशेठ जाधव आणि विक्रम जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार आहोत. विधानसभा निवडणुकीपासूनच “बदला घ्यायचा नाही, तर बदल करायचा आहे” हे आमचे धोरण आहे. त्याच धोरणानुसार शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांनीही या प्रवेशाचे स्वागत केले. यावेळी शिवरूपराजे खर्डेकर बोलताना म्हणाले की मंगळवार पेठ व सोमवार पेठ ज्या ठिकाणी असते त्यावेळी नगरपालिका ही त्यांच्याकडेच येते असे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व सोबत आल्याने आगामी काळामध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!