आपला जिल्हा

राजे गटाला मोठा धक्का माजी नगरसेवक सनी आहिवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश

(जावली/ अजिंक्य आढाव)- सध्या निवडणूकीच धडाका जोरदारपणे सुरू असतानाच फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक २ चे तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सनी (भैय्या) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत स्वरूप राजे खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पाटील यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की फलटण शहराचे सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दमदार कामकाज करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 02 चे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहणार आहोत. श्रीमंत शिवरुप राजे खर्डोकर यांनी यावेळी सांगितले की संपूर्ण फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही कामकाज करीत आहोत फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द आहोत. सनी भैय्या यांच्या रूपाने राष्ट्रवादी‌ पार्टी शहरात एक खंबीर युवा नेतृत्व मिळाले आहे त्यांचा मान ,सन्मान यथोचित पणे ठेवण्याचे काम राष्ट्रवादी पार्टी नक्की करणार आहे.

सनी आहिवळे यावेळी यांच्या या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षप्रवेशाने फलटण शहरातील राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. या पक्षप्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील राजे गटाची संभागळती कोण थांबवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!