(जावली/ अजिंक्य आढाव )-अखेर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा (झेडपी) आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाला लागला आहे. यामुळे महाराष्ट्रात तब्बल सुमारे पावणेचार वर्षांच्या खंडानंतर यंदा या निवडणुका होणार आहे. फलटण तालुक्यातील नवीन पुनर्रचित करण्यात आलेल्या बरड जिल्हा परिषद गट व दुधेबावी गणातुन राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद असुन जनसंपर्क ग्रामपंचायत,वाड्यावस्ती संपर्क आहे.
गाव बैठकामधे दुधेबावी ता. फलटण येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली बरड गट आणि दुधेबावी गणासाठी बैठक संपन्न झाली. रासप मधून बरड जिल्हा परिषद गटातून शामराव भीमराव मोरे हे इच्छुक उमेदवार आहेत. दुधेबावी पंचायत समिती गणातून डॉ. अंकिता प्रकाश सोनवलकर व सौ.मयुरी भाऊसो सोनवलकर आणि सौ.वर्षा सचिन शिंदे आणि सौ.सुनिता दत्तात्रय धायगुडे हे पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव अण्णा सरक हे उपस्थित होते.
दुधेबावी गावातील ग्रामस्थ डॉ. युवराज बिरू एकळ, दत्तात्रय धायगुडे, सचिन शिंदे, तानाजी बरकडे, पैलवान प्रकाश सोनवलकर, शामराव मोरे, बाजीराव सोनवलकर, भाऊसो सोनवलकर आणि दुधेबावीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.