आपला जिल्हा

बरड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविणार- गंगाराम रणदिवे

फलटण – (जावली /अजिंक्य आढाव ) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मा.श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा जिल्हाध्यक्ष श्री.रणजितभैय्या देशमुख व फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री.महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांच्या नेतृत्वाखाली गेली १९ वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करीत असून काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुंजवडीचे युवा नेते गंगाराम रणदिवे दिली आहे.

गंगाराम रणदिवे यांनी आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध पदे भूषविली असून त्यांनी सातारा जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे.

 बरड जिल्हा परिषद गटातुन उमेदवारीची संधी मिळाल्यास रोड मॉडेल बनवणार – गंगाराम रणदिवे

युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारा व राजकीय सामाजिक चळवळीमध्ये तसेच जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

मुंजवडी निंबळक राजुरी बरड बागेवाडी कुरवली आंदरुड जावली मिरढे वडले गावांमध्ये युवा वर्ग व नागरिकांसोबत मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा बालेकिल्ला असलेल्या बरड जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी मिळावी अशी मागणी जनतेमधून होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!