आपला जिल्हा
३९ वी किशोर किशोरी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा ; किशोर पुणे विरुद्ध सातारा तर किशोरींमध्ये धाराशिव – सोलापूर आमने सामने

मुंबई दि.२८ ( क्रीडा प्रतिनिधी) वडाळा येथे शारीरिक शिक्षण क्रीडा मंडळाच्या मैदानावरती सुरू असलेल्या ३९ व्या किशोर किशोरी राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून किशोर गटात पुणे विरुद्ध सातारा तर किशोरी गटामध्ये धाराशिव विरुद्ध सोलापूर यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. किशोरी गटामध्ये गतवर्षीच्या विजेते उपविजेते संघामध्येच लढत पाहायला मिळणार असून मागील वर्षीच्या पराभवाचा वचपा धाराशिव काढणार का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
सोलापूरकडून ठाण्याचा पराभव
किशोरी गटामध्ये पहिल्या उपांत्य सामन्यात सोलापूरने ठाण्याचा (२७- २३) अवघ्या चार गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. मध्यंतराला (१४- ०८) मिळालेली सहा गुणांची आघाडी सोलापूरच्या विजयासाठी निर्णायक ठरली. सोलापूर कडून कार्तिकी यलमार (२ मि.नाबाद २.३० मि. संरक्षण, ४ गुण) ऋतुजा सुरवसे (२.४० मि. नाबाद .२० मि. संरक्षण, २ गुण) यांचा खेळ सोलापूरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ठाण्याकडून निधी जाधव (२.४० मि.१.४०मि. संरक्षण) मानसी कांबळे (२.१० मि. संरक्षण, २ गुण) यांनी झुंजार खेळी करून देखील अपयशाला सामोरे जावे लागले. सोलापूर कडून ठाण्याला चार गुणांनी पराभव पत्करावा लागला.
धाराशिव कडून सांगली पराभूत
किशोरी गटात झालेल्या दुसऱ्या उपांत्य चुरशीच्या सामन्यामध्ये सांगलीला पराभवाची चव चाखायला लावली. धाराशिवकडे मध्यंतराला (०९- ११) अशी अवघ्या दोन गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर दोन्ही बलाढ्य संघांकडून पूर्ण ताकतीचा खेळ करत विजयासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु (२६- २३) असा तीन गुणांनी धाराशिव कडून सांगलीला पराभव स्वीकारावा लागला. धाराशिव कडून मुग्धा सातपुते (१.२७ मि. नाबाद १ मि. संरक्षण,६ गुण) स्वरांजली थोरात (नाबाद१.५५ मि. १.३८ मि. संरक्षण, ४ गुण) राही पाटील (२.२० मिनिट संरक्षण,४ गुण) यांच्या खेळाच्या जोरावर धाराशिव अंतिम फेरी धडक मारली. तर सांगलीकडून पायल तामखाडे (१.०५ मि. २.४० मि. संरक्षण, ६ गुण) अनुष्का तामखाडे (२.३० मि.नाबाद १.३० मि. संरक्षण, ४ गुण)वेदिका तामखाडे (२.२० मि, ०.४० मि.संरक्षण,४ गुण) यांनी केलेलं शर्तीचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
अंतिम फेरीतील सामने
किशोर गट
पुणे विरुद्ध सातारा
किशोरी गट
धाराशिव विरुद्ध सोलापूर
पुण्याची ठाण्यावर डावाने मात


