आपला जिल्हा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या फलटण येथे जाहीर सभा

(जावली/अजिंक्य आढाव) -फलटण नगरपरिषदेच्या सन २०२५च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या दुपारी २ वा गजानन चौक येथे जाहीर सभेच आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने पाहिल्याच वेळी फलटण येथे येणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.फलटण नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर व प्रभागातील शिवसेना व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे जात आहे.या सभेच्या माध्यमातून फलटण करांना काय संदेश देणार या कडे आता विरोधकान बरोबरच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपालिकेवर असलेली गेल्या ३५ वर्षांच्या विकास कामांना बरोबरच नवीन कोणती कामे येणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!