(जावली /अजिंक्य आढाव-) फलटण नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे यांच्याशी गेली कित्येक वर्ष प्रामाणिक राहिलेले अनेक शिलेदार राजे गटाच्या या कठीण काळात त्यांना सोडून जाताना दिसत आहेत. यामध्ये फलटण नगर परिषदेचे दिग्गज नगरसेवक व ज्यांच्या घरात नगराध्यक्ष पदाची माळ यापूर्वी अनेक वेळा पडलेली आहे अशी काही मातब्बर लोक श्रीमंत रामराजे यांना सोडून जाताना दिसत आहे. त्यामुळे श्रीमंत रामराजे यांना फलटण शहरातील जनतेची सहानुभूती मिळणार काय अशी चर्चा फलटणमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
गेली 35 वर्ष फलटण शहरांमध्ये नगर परिषदेची सत्ता श्रीमंत रामराजे यांच्या ताब्यात राहिली आहे विशेष करून श्रीमंत रामराजे यांची राजकीय कारकीर्द 1992 साली फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून सुरू झाली.
यानंतर श्रीमंत रामराजे यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने सुरू झाली कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल राज्यमंत्री तदनंतर जलसंपदाचे कॅबिनेट मंत्री, राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व पुढे तब्बल ७ वर्ष महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांची कारकीर्द भरारली आहे. श्रीमंत रामराजे हे एक धुरंदर राजकारणी म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कोणता मास्टर स्ट्रोक मारणार हे पाहणे आवश्यक याचे ठरणार आहे.