जावलीत नवरात्रोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्राची लोककला’ आणि भव्य कुंकू पुसलं सौभाग्य हासलं या कौटुंबिक नाटिका कार्यक्रमाचे आयोजन..! सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष उपक्रम
सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता रंगणार सांस्कृतिक कार्यक्रम
(जावली/ अजिंक्य आढाव) : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, जावली (ता. फलटण, जि. सातारा) यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आणि मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे जावली परिसरातील नागरिकांना कला, संस्कृती आणि मनोरंजनाची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.
या विशेष सोहळ्यात ‘महाराष्ट्राची लोककला’ या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी खास ‘कुंकू पुसलं, सौभाग्य हसलं’ ही कौटुंबिक नाटिका सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे दर्शन घडविण्यासोबतच कौटुंबिक जीवनातील भावभावना मांडणाऱ्या या नाटिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
तसेच, कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य ‘हिप्नोटिझम’ कार्यक्रम! या कार्यक्रमातून संमोहन कलेचे विविध प्रयोग, प्रेक्षकांचा सहभाग आणि आश्चर्यकारक प्रात्यक्षिके अनुभवण्याची संधी मिळणार आहे. मनोरंजनासोबतच संमोहन कलेविषयी कुतूहल निर्माण करणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमांचे नियोजन समस्त ग्रामस्थ, जावली यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, जावली येथे हे कार्यक्रम होणार आहेत.
नवरात्रोत्सवातील या विशेष सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक सोहळ्याचा लाभ जावलीसह परिसरातील नागरिकांनी, महिला भगिनींनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.