निवेदनानुसार, मुंजवडी ग्रामपंचायतीच्या मालकीचे हे व्यापारी गाळे असून, या व्यापारी संकुलाचे नाव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल असे आहे. या संदर्भात रणदिवे यांनी यापूर्वीही ग्रामसेवकांशी पत्रव्यवहार करून संकुलाच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्यापारी संकुलातील एका गाळ्याचे पत्र्याचे छत पूर्णपणे गंजले असून, त्याचे तुकडे-तुकडे झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संकुलाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असताना, त्याऐवजी डिजिटल फलक बसविण्याचे काम करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास दि. ०२/०९/२०२६ पासून व्यापारी संकुलासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण आणि ग्रामीण पोलीस ठाणे फलटण यांना देण्यात आल्या आहेत.