आपला जिल्हा

फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. २ मध्ये वैशाली सुधीर अहिवळे यांना उमेदवारीची मागणी : भाजपा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार

फलटण (प्रतिनिधी) : फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांना उमेदवारीची मागणी होत आहे. सौ.वैशाली अहिवळे यांच्या घरात दोन पिढ्यांचा राजकीय वारसा आहे. स्थानिक राजकारणात त्यांचा चांगला दबदबा असून भाजपा उमेदवार म्हणून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

त्यांचे सासरे कालकथित तानाजीराव अहिवळे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यांनी अपक्ष म्हणून राजे गटाविरोधात मोठा विजय मिळवीला होता. तर त्या फलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. म्हणजेच घरात राजकारणाची शिदोरी आणि जनतेच्या विश्वासाचा ठेवा दोन्ही आहे.

भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अशा कार्यक्षम, प्रभावी आणि लोकांमध्ये कार्याचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना संधी द्यावी अशी मागणी प्रभाग 2 मधून होत आहे. सौ. वैशाली अहिवळे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

त्यांचे पती सुधीर अहिवळे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. फलटण शहरातील अनेक सामाजिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, तसेच महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळेच वैशाली अहिवळे यांना स्थानिक स्तरावर लोकसंपर्काचा फायदा होईल असे जाणकार सांगतात.

महिला मतदारांमध्ये सौ. वैशाली अहिवळे लोकप्रिय असून, त्यांची सामाजिक कार्याची छाप देखील उल्लेखनीय आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपकडून लढणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये वैशाली अहिवळे हे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

वैशाली अहिवळे यांचे थोरले दिर कालकथित आशिष अहिवळे यांचे सामाजिक कार्य अनेकांना आजही प्रेरणा देते. युवक संघटन हे आशिष यांचे बलस्थान होते. आजही त्यांच्या कार्याने प्रेरित अनेक सहकारी अहिवळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहेत.

राजकीय वर्तुळात प्रभाग २ मधील स्पर्धा रंगणार याबाबत शंका नाही. मात्र राजकीय पार्श्वभूमी, संघटन कौशल्य यामुळेच वैशाली अहिवळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!