(फलटण /प्रतिनिधी): फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेच्या (धनुष्यबाण) चिन्हावर लढणारे कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले आपल्या खास शैलीमुळे विरोधकांसमोर प्रभावी ठरत आहेत. दादासाहेब चोरमले हे केवळ राजकीय कार्यकर्ते नाहीत, तर आपल्या परखड व्यक्तिमत्त्वासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ते शहरात प्रसिद्ध आहेत. ‘राजे गटा’च्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीही फलटण शहराच्या विकासात मोठे योगदान दिलेले आहे.
दादासाहेब चोरमले यांच्या विजयाच्या आशा का वाढल्या आहेत, याबद्दल नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे सर्वसामान्य मतदारांशी असलेला त्यांचा थेट आणि सततचा संपर्क. लोकांच्या समस्या, गरजा आणि प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. नुसती जाणीव नाही, तर ते प्रश्न त्वरीत सोडवण्याची कला त्यांच्याकडे आहे, असे मतदार बोलून दाखवत आहेत. त्यांच्या या गुणवत्तेमुळे ते प्रभागात लोकांचे मन जिंकत आहेत.
‘राजे गटा’चे मोठे नेते आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि युवा नेतृत्त्व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली दादासाहेब चोरमले यांनी आपला प्रचार अधिक गतिमान केला आहे. त्यांचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकी ही दोन्ही समीकरणे त्यांना बळ देत आहेत. प्रभागातील मतदारांना एक जाणकार, स्पष्टवक्ता आणि लोकांच्या कामाला तत्पर असलेला प्रतिनिधी त्यांच्या रूपाने मिळत आहे.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक ११ मध्ये दादासाहेब चोरमले यांच्या अनुभवाचा, परखडतेचा आणि सामाजिक कार्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रश्नांची जाण आणि ती सोडवण्याची कला यामुळे ते प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर प्रभावी ठरत आहेत.