क्रीडा व मनोरंजन

रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्पोर्ट डे निमित्त शालेय स्पर्धां संपन्न

अनेक गुणवंत खेळाडू रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून घडतील - दादासाहेब चोरमले

(जावली/ अजिंक्य आढाव ) – रॉयल इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज जावली च्या वतीने स्पोर्ट डे निमित्ताने दि. 29 व 30 रोजी शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन गुणवत्तेबरोबरच शरीर आणि मन तंदुरुस्त असणे सध्याच्या काळाची गरज आहे. खेळामधून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा बरोबरच तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय, नॅशनल स्पर्धेमध्ये सध्या अनेक खेळाडूंना संधी मिळत असून गुणवत्ता टिकवण्यासाठी शालेय वयातच अनेक चांगले खेळाडू घडतात. सध्या खेळाडूंसाठी एमपीएससी यूपीएससी मध्ये राखीव जागा रिक्त असतात त्या मिळवण्यासाठी आतापासूनच योग्य मार्गदर्शन घेत पुढील वाटचाली कराव्यात आणि रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली या शाळेमध्ये अनेक गुणवंत खेळाडू असून खेळामध्ये चमकतील असे प्रतिपादन महाराष्ट्रराज्य खो – खो असोशियन उपाध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले असे प्रतिपादन यांनी केले.

शालेय अंतर्गत स्पर्धेमध्ये धावणे, हॉलीबॉल, कबड्डी, खो- खो, लंगडी, डॉज बॉल, गोळा फेक, लांब उडी , उडी, रिले, खेळांचे अशा विविध खेळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अतिशय अटीतटीचे सामने मैदानावर पहिला मिळाले.

या स्पर्धेसाठी जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. अमोल चवरे, प्राचार्या सौ. कांचन चवरे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व आस्था टाइम्स संपादक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले,फलटण शहरातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर अमर पिसाळ, निखिल ढोबे, परिश्रम न्यूज चॅनेल संपादक अजिंक्य आढाव शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!