(जावली /अजिंक्य आढाव ) – जावली ता फलटण येथील रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने सन 2025/26 वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांची कलागुणे सादर करण्याची, शिक्षक-पालक-विद्यार्थी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि स्नेहबंध दृढ करण्याची एक अविस्मरणीय संधी असते; ज्यात रंगीत तयारी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात येते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्रीमती ज्योती चव्हाण महिला पोलीस उपनिरीक्षक फलटण ग्रामीण, श्री शरद वसंत गावडे उप कृषी अधिकारी महाड, तसेच तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहन साहेबराव डांगे संस्थापक मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी, शाळेचा कार्यक्रम श्री संदीप विलासराव जगताप पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण यांच्या शुभहस्ते होणार असून मार्गदर्शक म्हणून दशरथ हरिबा चवरे,अध्यक्ष जाई एज्युकेशन सोसायटी जावली व पोपट हरिबा चवरे प्राचार्य सांगोला विद्यामंदिर सांगोला, बाळासाहेब गावडे माजी सैनिक उपस्थित राहणार असून रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावलीच्या वतीने सर्व पालक व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.