(जावली | प्रतिनिधी)जावली परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या जावली प्रीमियर लीग (JPL) २०२६ पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेकडे परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला २१ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिकासाठी सुरज काकडे साहेब, विलासराव बागाव (फौजी) आणि प्रताप ढेंगळे (महावितरण साहेब) यांचे सौजन्य लाभले आहे. तर द्वितीय पारितोषिकाचे सौजन्य सागर बाळासो लोढे सर (मिरढे) यांनी दिले आहे.
स्पर्धेसाठी ट्रॉफीचे सौजन्य अंकुश बाळासो पोळके (श्रीनाथ कन्स्ट्रक्शन, जावली), बॉल बॉक्सिंगचे प्रायोजक अतुल आप्पासो गोंफणे (बिंगा), ग्राउंडचे सौजन्य प्रतापराव मोरे, तर जारचे सौजन्य कुमार आवघडे यांनी दिले आहे.
चार संघांत रंगणार क्रिकेटचा थरार..!
स्पर्धेच्या नियमानुसार चार संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघात १४ खेळाडू असतील. खेळाडूंसाठी २५० रुपये प्रवेश नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी एक संघमालक व एक कर्णधार यांच्या नेतृत्वाखाली ११ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जावली गावातील प्रत्येक संघात पाच खेळाडू असणे अनिवार्य आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून खेळाडू कडून गैरवर्तन आढळल्यास पाच धावांची पेनल्टी आकारण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
स्थानिक खेळाडूंना मिळणार संधी
जावली प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्थानिक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. गावातील युवकांमध्ये क्रीडाभावना वाढविणे, संघभावना निर्माण करणे आणि क्रिकेटच्या माध्यमातून गावातील एकोपा अधिक मजबूत करणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.
३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेत कोणता संघ बाजी मारणार, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. आकर्षक पारितोषिके आणि स्थानिक खेळाडूंच्या सहभागामुळे जावली प्रीमियर लीग २०२६ पर्व पहिले रंगतदार ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.