(जावली/ अजिंक्य आढाव ) राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत कु. पै. श्रीनिधी निखिल अभंग हिने ३६ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या दैदिप्यमान यशाच्या जोरावर तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रीनिधीने आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि उत्कृष्ट कुस्ती कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरावर यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरावर सुवर्णपदकाची कमाई , आता दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी ! कु. पै. श्रीनिधी निखिल अभंग हिचे या शानदार यशाबद्दल हार्दिक अभिनंदन होत आहे…!