कृषी व व्यापार
शासनाने दुष्काळ पळवला, अवकाळीने बागा नासवल्या , दाद कोणाकडे मागायची माणच्या शेतकर्यांची अवस्था..?
(म्हसवड /प्रतिनिधी) : वर्षानुवर्षे पाणी टंचाई, चारा टंचाई , अन्नधान्याची टंचाईच्या दुष्टचक्रात सापडलेल्या माण मधील परिस्थिती आज तरी जैसे थे असताना व येणाऱ्या सात महिन्यात माणसांच्या व जनावरांच्या पाण्याची भ्रांत पडलेल्या व जनावरांना चारा कोठून आणायचा याची चिंता पडली असताना दोन महिन्यापूर्वी राजकारणी मंडळीनी व महाराष्ट्र शासनाने माण खटावचा दुष्काळ एकीकडे पळवून लावून दुष्काळी सवलतीला माण खटला ठेंगा सरकारने दाखवला तर अवकाळीने शेतकरी राजाचे हाता तोंडाला आलेले पिकांना व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून रब्बीच्या ज्वारीचा मात्र याचा फायदा झाला असून परवा अवकाळीच्या रिमझिम पावसामुळे द्राक्ष घडांचे मोठे नुकसानीत आणखी भर पडल्याने उत्पन्नात घट व खर्च जादा अशी अवस्था माणच्या शेतकरी बांधवाच्या सरकारने केल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त मनस्थितीत आहेत
अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने काल म्हसवड परिसरातील ढोकमोडा ,देवापूर,पळसावडे,जांभुळणी,,शेनवडी व काळचौडी या भागात जावून करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित कृषी विभागाचे अधिकारी यांना आदेश दिल्याने तातडीने पंचनामे केले तसे नुकसानीची मदत हि तातडीने देण्याची मागणी देवापुर येथील द्राक्ष उत्पादक आदर्श शेतकरी शहाजी बाबर यांनी दिली
माण तालुक्याच्या पुर्व भागात काल रात्री अवकाळी रिमझिम पडलेल्या पावसामुळे देवापुर , पळसावडे , ढोकमोडा इत्यादी गावांच्या परिसरात बहरलेल्या द्राक्ष बागांना फटका बसला.रब्बी हंगामातील जिराईत क्षेत्रातील पेरणी केलेल्या ज्वारी पिकास याचा फायदा झाला.माण तालुक्याच्या पुर्वीकडीलढोकमोडा,देवापूर,पळसावडे,जांभुळणी,,शेनवडी काळचौडी इत्यादी गावांच्या परिसरात द्राक्ष बागा आहेत.
द्राक्ष बागेतील वेलीवरील घडातील द्राक्ष मणके रिमझिम पाऊस व धुकट हवामानामुळे काळे पडले काही मणक्यास तडे गेल्याचे निदर्शनास आले.बुरशीजन्य कुजवा या रोगाचा झपाट्याने प्रादुर्भाव झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल मनस्थितीत आहेत.
गेल्या पंधरा दिवसात याच परिसरात सातत्याने ढगाळ व धुकट हवामान टिकून राहून रात्रभर अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष रागावर कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढून बागेतील द्राक्ष घडातील मणके काळी पडून मोठे नुकसान झाले होते.
या रोगाचा जलद गतीने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतक-यांना औषध फवारणीचा खर्च माथी पडला या घटनेनंतर पुन्हा कास रात्री रिमझिम झालेल्या पावसामुळे बागेतील द्राक्ष घडांचे नुकसान होण्यास आणखी भर पडल्याने उत्पन्नात घट व खर्च जादा अशी विसंगती झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त मनस्थितीत आहेत
परवा झालेल्या अवकाळीच्या रिमझिम पावूस व वादळी वाऱ्याने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले वादळी वाऱ्यासह पाऊसाने ज्वारीचे पिक झोपले , जनावरांच्या चाऱ्यासाठी लावलेली मका हि झोपल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर बनणार आहे त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रश्न प्रशासन कसा मार्गी लावणार याची हि चिंता वाढणारी आहे