हि बातमी ईतर भाषेत वाचा
कृषी व व्यापार

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन गाव बैठक जावली ता.फलटण येथे संपन्न

(जावली/ अजिंक्य आढाव)- सध्या फलटण पूर्व भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.मात्र पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी वर्ग येणाऱ्या जुन महिन्यात पाऊसाची वाट पाहताना दिसतो आहे.यातच  महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन सन 2024  जावली.ता.फलटण येथे गाव बैठक संपन्न झाली यावेळी   मोठ्या प्रमाणात  शेतकरी उपस्थितीत होते.

 या कार्यक्रमावेळी कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर यांनी  मार्गदर्शन करताना विविध कृषी विषयक माहिती सांगताना वैशिष्ट्य पूर्ण मुद्द्यावर चर्चा केली.

१)खरीप हंगाम मका शेतीशाळा२)बाजरी प्रकल्प प्रात्यक्षिक३) बिजप्रक्रीया मोहिम.४)हुमणी नियंत्रण प्रकाश सापळे लावणे.५)फेरोमन सापळे ,पक्षी थांबे लावणे ६)कांदा व सोयाबीन उगवणक्षमता चाचणी७)फळबाग लागवडव व बांबु लागवड ८)माती परीक्षण ९) पाचट व्यवस्थापन१०)ठिबक सिंचन ,११) महाडिबीटी (कृषीयांत्रीकीकरण) १२)पिक विमा व शेतकरी विमा योजना १३)सोयाबीन व कपाशी लागवड क्षेत्रात वाढ करणे,अशा विविध योजन बाबत मार्गदर्शन केले.

मका पिक शेतीशाळा जमीन तयार करणे,पुर्व मशागत ते काढणी पश्चात व्यवस्थापन, विक्री, मका पिक प्रक्रिया उद्योग बाबत मार्गदर्शन पिक उत्पादन खर्च कमी करून निवळ्ळ आर्थिक उत्पन्न वाढवणे.शेतीशाळेत बाबत माहिती देण्यात आली
एकात्मिक पध्दतीने योग्यवेळी किडीचे नियंत्रण करून हुमणी कीड व्यवस्थापना वरील खर्च कमी करणे व आर्थिक बचत करणे.
पिकांवरील रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी कशा प्रकारे निगा राखणे या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली
वर्षातुन एकदा माती परीक्षण करूण आपल्या जमीनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते.माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्र देऊन रासायनिक खतावरील खर्च कमी करणे , पिका मधुन आर्थिक उत्पन्न वाढ करण्यास मदत होते.
बिजप्रक्रिया प्रतेक वेळी जमिनीत बियाणे पेलताना बियाण्यास जैविक व रासायनिक बिजप्रक्रिया करावी.बियाण्यांची उगवण क्षमता वाढवणे,रोग प्रतीकात्मक शक्ती निर्माण करणे रासायनिक खतात बचत करणे.बाबीचा फायदा होतो.व रासायनिक बिजप्रक्रिया केल्याने किड व रोग नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.रासायनिक खत,किड नियंत्रणात बचत होते.
पाचट व्यवस्थापन मुके कार्बन उत्सर्जन कमी करणे. पर्यावरणाचा समतोल व जमीनीचे आरोग्य अबाधित राखण्यास फायदा होतो.५ ते ६ टनापर्यंत कंपोस्ट खत जमीन उपलब्ध करून देण्यात मदत होते व २० ते २५ हजारांपर्यंत आर्थिक फायदा होतो .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!