हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

यात्रेला येणाऱ्या भक्तांना कोणत्याही विभागाकडून अडचण, अडथळा झाला तर खपवून घेणार नाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ; बैठकीत बांधकाम, पालिका, पोलिस रस्ते विकास जिल्हाधिकारी व आमदार यांचेकडून धारेवर…!

यावर्षी रथ जुन्या मार्गाने नदी पात्रातून जाणार

श्रींचा रथ हा माणगंगा नदीपात्रातुन श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी चा रथ हा येथील माणगंगा नदीपात्रात नेण्याची फार जुनी परंपरा आहे, मात्र गतवर्षी या नदीपात्रात पाणी नसल्याने श्रीं. चा रथमार्ग नदी मधून करणार आहे असे मानकरी व भाविकांना सांगितले

(म्हसवड/ प्रतिनिधी) पाच लाख भाविक सिध्दनाथ जोगेश्वरी रथोत्सवा दिवशी येण्याची शक्यता धरुन पोलिस विभाग, बांधकाम, नगरपालिका, विज मंडळ, एस टी महामंडळ यांनी यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेऊन आप आपल्या विभागाची कामे रथोत्सवा पूर्वी म्हणजे १० डिसेंबर पूर्वी करुन घ्यावी १० तारखेला ज्यावेळी मि तुम्ही केलेल्या कामाची पाहणी करणार आहे त्यावेळी कोणत्याही विभागाचे काम अपूर्ण, वा लावूलिजाव खपवून घेतला जाणार नाही आज मी स्वता रथ मार्गाची, शहरात येणाऱ्या शिंगणापूर रोड ते रथ मार्ग स्मशान भुमि पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे याची पहाणी केली रथ मार्गाचे खड्डे बांधकाम विभागाने भरले म्हणता मग रस्तावाहुन जाईल एवढा पाऊस दुष्काळी माण मध्ये झाला का असा सवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी करत,बांधकाम, पी डब्ल्यू डी, नगरपालिका , आरोग्य विभाग व एस टी महामंडळ यांचा चांगला समाचार घेतला

म्हसवड शहरातील सिद्धनाथ मंदिरा समोरील पाहणी करताना आ.जय कुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र गुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख

येत्या आठ दिवसात मध्ये श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव होणार आहे या दरम्यान पाच ते सहा लाख भाविक येण्याची शक्यता धरुन यात्रेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांनी नियोजन बैठक सिध्दनाथ मंदिरात आयोजित केली होती या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, आ. जयकुमार गोरे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, डि वाय एस पी. अश्विनी शेंडगे, तहसिलदार विकास अहिरे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, तालुका वैद्यकिय लक्ष्मण कोडलकर, पोलिस स्टेशनचे राजकुमार भुजबळ, रथाचे मानकरी बाळासाहेब राजेमाने, जयसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, गणपतराव राजेमाने, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, सुरेश म्हेत्रे, विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, धनाजी माने, शहाजी लोखंडे, कैलास भोरे,अकिल काझी, विकास गोंजारी, करण पोरे उपस्थित होते , प्रथम यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने कोणती जबाबदारी आहे, आणी त्यांनी त्या विभागाचे काम सुरू केले का, केले असेल ते ऐकले त्या विषयावर बोलताना जिल्हाधिकारी डुडी म्हणाले आढावा बैठक हि दर वर्षी होते काम केलं वा नाही केलं काही फरक पडत नाही हि जी तुमची समजूत आहे ती हे पहिल्यांदा डोक्यातून काढा प्रश्न विचारतात अन् सोडुन देतात यावेळी तसे होणार नाही प्रत्येक विभागाची जातीने चौकशी करून त्यांना दिलेल्या जबाबदार्यांची पहाणी १० डिसेंबरला करणार आहे.

मुख्याधिकारी सचिन माने यांना जिल्हाधिकारी म्हणाले पाच ते सहा लाख भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी फक्त ८० स्वछता कामगारांवर कशी होणार तसे पाहिले तर यात्रेची सर्व जबाबदारी ही म्हसवड पालिकेची आसून शहर परिसरात एक किलोमीटर वर एक फिरते शौचालय उभे करा कमीत कमी ३० शौचालये मागवा यात्रेतील व शहराच्या स्वछतेसाठी कमीत कमी ३०० ते ४०० स्वच्छता कामगार भरा , बांधकाम विभागाचे अभियंता खोत यांना म्हणाले दुष्काळी माण मध्ये एका रात्रीत एवढा पाऊस झाला का तुम्ही मुरवलेले खड्डे वाहुन गेले मी आता पाहून आलो आहे पुन्हा खड्डे भरा कारणे सांगू नका असा सज्जड दम भरला, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी आरोग्य विभागाच्या कामाची माहिती दिली त्यावेळी पाणी तपासणी निगेटिव्ह ची पॅजिटीव्ह झाल्याने बैठकीत हशा पिकला , एसटी, एम एस ई बी, पोलीस यांची माहिती घेऊन सुचना केल्या व म्हणाले १० तारखे पर्यंत सर्व विभागाने कामे करून घ्यावे अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल कोणाची हि गय केली जाणार नाही असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

तर आ जयकुमार गोरे यांनी हि बांधकाम, पी डब्ल्यू डी, एस टी महामंडळ, पोलीस, रस्ते विकास महामंडळ पूणे अधिक्षक अभियंता, मेघा कंपनीचे ठेकेदार यांचा चांगलाच समाचार घेत धारेवर धरताना रस्ते विकास महामंडळ पूणे येथील अधिक्षक अभियंता अश्विनी घोडके व मेघा इन्फ्रास्ट्रक्चर हैदराबाद या कंपनीचे सब ठेकेदार यांना धारेवर धरत आ गोरे म्हणाले आजून किती वर्षी यात्रा आली कि तुमच्या कामाचे तुन जुने वाजवणार असी झापा झाली करत असताना तो ठेकेदार हासल्याने पागल (वेड) आहे का मी बोलतोय आणी तो हास्य.. ? मराठी कळत नाही तर कसाला ठेवलाय कामावर मॅडम पुलाचे काम, रस्त्यावर दिशा दर्शक फलक, रिफलेक्टर, स्पिडब्रेकर, स्वाक्षरी भित दोन रस्ते जोडताना केलेल्या टाळा टाळीमुळे अनेकांचे जिव गेले म्हसवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले म्हणजे काम झालं का ? त्याचेवर म्हसवड पोलिसांनी मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे होते या बाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे , एस टी महामंडळ यांनी ५० /१०० बसेस आणण्यापेक्षा वीस बसेस आणा त्या चांगल्या रस्त्यात बंद पडून वाहतूकीला अडथळा करणार्या बसेस नको, रथ मार्गाला सतत अडचण ठरणारे साईटचे खांब अनेक वर्षापासून बाजूला घेण्या बाबत प्रश्न केला जातो त्याकडे लक्ष घाला , यात्रा पटांगणावर जागा भाडे बाबत पालिकेने व्यावसायिका कडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी नये यात्रा भरण्यासाठी प्रयत्न करा असे हि मुख्याधिकारी यांना सुचना केल्या.

यावेळी बीडीओ. दहिवडी, साबां उप अभियंता धीरज विजापुरे, सहाय्यक अभियंता प्रकाश गायकवाड, शाम ठोंबरे, ग्रामीण पाणीपुरवठा सचीन खताळ, म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे, वाहक नियंत्रक कोळी एम. एस. सी. बी. चे उपअभियंता आर. बी. डावरे, आर एम लादे, वसंत भोसले, म्हसवड शहर वीज वितरण कंपनी उपअभियंता, म्हसवड नगरपालिका मुख्य लिपिक म्हसवड शहर नगरपालिका अभियंता चैतन्य देशमाने म्हसवड- महसूल तलाठी यु. डी. आकडमल म्हसवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त गणेश गुरव, हरिभाऊ गुरव, वैभव गुरव, बुरांडे वकील, पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!