(फलटण/ प्रतिनिधी) : येथील मुधोजी महाविद्यालयाच्या एमसीए विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ.राकेश रामाकांत कुलकर्णी यांनी संगणक व्यवस्थापन विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पीएच.डी.ची अंतिम मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
त्यांच्या संशोधनाचा विषय “डिसिजन सपोर्ट सिस्टीम फॉर वॉटर मॅनेजमेंट ऑप्टिमायझेशन इन अॅग्रीकल्चर सेक्टर यूजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अँड इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)” हा होता. शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर, स्मार्ट सिंचन व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जलव्यवस्थापन प्रभावी करण्यावर त्यांच्या संशोधनात भर देण्यात आला आहे.
या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष पारख यांचे मार्गदर्शन लाभले.सध्या डॉक्टर राकेश कुलकर्णी हे मुधोजी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर व व्यवस्थापन विभागातील एम.सी.ए विभागात असिस्टंट प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियमक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी,मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.