(फलटण/ प्रतिनिधी)- फलटण तालुक्यातील निभोंरे गावातील पूणे – पंढरपूर रोडवरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण आणि भावाचा खून झाल्याची घटना घडली आहे.खून कोणी व का केला याचा तपास घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी कारवाई करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सीताबाई शिंदे व अमित शिंदे या दोघा सख्या बहीण भावाचा समावेश आहे.
शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून फलटण ग्रामीण पोलिसांंचे पथक घटनास्थळी पंचनामा करण्याची कारवाई करीत असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.