(विडणी /प्रतिनिधी ) – विडणी गावच्या सुनबाई सुप्रिया कुंदन शेंडे यांनी स्पर्धा परिक्षेत बीडीओ पदी निवड झाली.
सुप्रिया शेंडे यांचे खटाव तालुक्यातील बुध(करंजओढा)गावच्या शेतकरी कुंटुबातील माहेर वाशीन असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा (करंजओढा)येथे करुन माध्यमिक शिक्षण श्री सेवागिरी विद्यालय पुसेगांव येथे घेतले.उच्यशिक्षण सिंहगड कॉलेज पुणे येथे इंजिनअरिंग डिग्री घेतली.सन २०१४ साली विडणी येथे आयटी इंजिनियर कुंदन शेडे यांच्याशी विवाह झाला.
सासरच्या लोकांनी व पती कुंदन शेंडे खंबीर साथ व पाठीबा देऊन स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली.खाजगी कंपनी मधील काँर्पेरेट नोकरी सोडून स्पर्धा परिक्षेचे तयारी सुरु केली.राजपञित अधिकारी होण्याची ध्येय मनाशी बाळगून जिद्द चिकाटी अभ्यासात सातत्य ठेवून सन २०२२ ला झालेल्या स्पर्धा परिक्षेत बीडीओ पदी निवड झाल्याने अधिकार्याचे विडणी गांव मध्ये मानाचा तुरा रोवला आहे.
सुप्रिया शेंडे यांच्या यशाबद्दल सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेञासह नातेवाईक विडणी व बुध गावातील ग्रामस्था मधुन शुभेच्छाच वर्षाव होत आहे.