(जावली/ अजिंक्य आढाव) महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांमध्ये आनंद सावंत सर यांची निवड झाली आहे. अतिशय हालकीच्या परिस्थितीतुन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवले आहे.
घरची परिस्थिती अतिशय हालकी असताना सुद्धा त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत यातुन वेळ मिळेल असे दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात घरातील जबाबदारीचे ओझे संपूर्णपणे खांद्यावर घेत. मेहनत केल्याने सफलता मिळते हे उदाहरण आनंद सावंत यांच्या माध्यमातून दिसत आहे.
विशेषतः आद्यप थांबले नाहीत या पुढे ही ते स्पर्धा परीक्षा देणार असल्याचे सांगितले. एमपीएससी व युपीएसी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रमाणिक पणे दररोज अभ्यास करावा, व्यसना पासून दुर रहावे.असे ते बोलत होते,आनंद सावंत यांच्या यशाने कुटुंबातील सदस्यांनी व परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे.