हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

गोखळी व विडणी येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी

(गोखळी /प्रतिनिधी)- फलटण तालुक्याच्या पूर्व भागात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जंयती विडणी , गोखळी उत्साहात साजरी करण्यात आली.विडणी येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने उत्तरेश्वर मंदिरात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय मध्ये देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, विडणी शाखाध्यक्ष राहूल शिर्के ,ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग , श्रीनिवास पवार ,अशोक अभंग , किसनराव टिळेकर , सुभाष कदम, किशोर जगताप ,दत्ता निकम , सचिन पवार,पंकज शिंदे,अजित भोसले, अक्षय अभंग ,दिनेश अभंग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. फलटण पूर्व भागातील गोखळी येथील हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त विद्यालयाचे प्राचार्य हरीभाऊ अभंग सर यांच्या हस्ते छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी खास धाकड गर्ल कुमारी स्वरा योगेश भागवत हिने मनोगत व्यक्त केले विद्यालयातील ओम थोरात कु चव्हाण या विद्यार्थ्यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.

सुनील सस्ते सर यांनी आभार तर राजेंद्र भागवत यांनी सुत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!