हि बातमी ईतर भाषेत वाचा
कृषी व व्यापार

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान रब्बी हंगाम सन 2023-24 अंतर्गत पिक कार्यशाळा संपन्न

(जावली/अजिंक्य आढाव)महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी फलटण मंडळ कृषी अधिकारी बरड व  ग्रामपंचायत आदंरूड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा  अभियान रब्बी हंगाम सन 2023-24 अंतर्गत दिनांक 30/11/23 ठिकाण चादंखन मंदिर आदंरूड वार गुरुवार रोजी पिक रब्बी ज्वारी शेतकरी शेतीशाळा वर्ग क्रं-3 घेण्यात आला.

या वेळी आदंरूड गावातील शेतकरी मित्रांना मा.तालुका कृषी अधिकारी फलटण प्रमोद जाधव साहेब व मा.मंडळ कृषी अधिकारी बरड अशोक नाळे साहेब याचे मार्गदर्शना खाली विविध विषयास अनुसरून मार्गदर्शन केले.

1) रब्बी ज्वारी एकात्मिक पिक व्यवस्थापन .किड व रोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन
2)रब्बी हंगाम पिक विमा व फळ पिक विमा
3)ठिबक व तुषार सिंचन योजन
4) पि.एम किसान योजन
5)पाचट आच्छादन व्यवस्थापन
6)चारा व्यवस्थापन
7)बांबु लागवड योजना
8)फळबाग लागवड योजना
9)महाडिबीटी व कृषीयांत्रीकीकरण योजना
10)नविन मतदार नोदंणी व मयत व दुबार नाव वगळणे बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

1) मंडल कृषी अधिकारी बरड अशोक नाळे साहेब यांनी मानवी आहारात ज्वारी बाजरी नाचणी अन्न धान्यं महत्व व कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग व महत्व बाबत मार्गदर्शन केले.

2) कृषी पर्यवेक्षक बरड दत्तात्रय एकळ यांनी रब्बी हंगामातील हंगाम एक रूपयात पिक विमा योजना व कृषी विभागाच्या फळबाग लागवड, ठिबक सिंचन , महाडिबीटी योजना व ईतर विविध योजन बाबत मार्गदर्शन केले.

3)कृषी सहाय्यक मिरढे संजय करचे यांनी मागेल त्याला शेततळे योजना बाबत मार्गदर्शन केले.

4) कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर यांनी शेतीशाळा प्रवर्तक म्हणून शेतीशाळा आयोजन व सुत्र संचालन केले.व पि.एम किसान योजन , पाचट आच्छादन  व्यवस्थापन , चारा व्यवस्थापन , बांबु लागवड योजना , पांडुरंग फुंडकर फळबाग, लागवड योजना बाबत मार्गदर्शन केले.

शिवार फेरी अंतर्गत राजेंद्र हरिचंद्र राऊत गावठाण यांच्या ठिबक सिंचन वरील ज्वारी प्लॉट व संदिप राऊत जुना मला याचे उत्कृष्ट ज्वारी प्लॉट ला शास्त्रज्ञ सल्ला व भेट देण्यात आली.

तसेच नविन मतदार नोदंणी व मयत व दुबार नाव वगळणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व 10 नविन मतदार नाव नोदंणी फोर्म स्वीकारले.

या वेळी उपस्थित शेतकरी मित्रांना डायरी, पेन व उपहार पोहे ,चहा देण्यात आला. या वेळी आंदरुड गावच्या सरपंच माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य , प्रगतशील शेतकरीवर्ग व 45 शेतकरी उपस्थितीत राहुन विविध योजन बाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमा वेळी उपस्थित शेतकरीवर्ग व कृषी विभागातील अधिकारी याचे प्रगतशिल शेतकरी धनाजी सावळा राऊत यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!