(जावली/अजिंक्य आढाव) महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी फलटण मंडळ कृषी अधिकारी बरड व ग्रामपंचायत आदंरूड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान रब्बी हंगाम सन 2023-24 अंतर्गत दि 30 रोजी चांदखान मंदिर आदंरूड रोजी पिक रब्बी ज्वारी शेतकरी शेतीशाळा वर्ग क्रं – 3 घेण्यात आला.
या वेळी आदंरूड गावातील शेतकरी मित्रांना मा.तालुका कृषी अधिकारी फलटण प्रमोद जाधव साहेब मंडळ कृषी अधिकारी बरड अशोक नाळे साहेब याचे मार्गदर्शना खाली विविध विषयास अनुसरून मार्गदर्शन केले.
1) रब्बी ज्वारी एकात्मिक पिक व्यवस्थापन किड व रोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन
2)रब्बी हंगाम पिक विमा व फळ पिक विमा
3)ठिबक व तुषार सिंचन योजन
4) पि.एम किसान योजन
5)पाचट अच्छादन व्यवस्थापन
6)चारा व्यवस्थापन
7)बांबु लागवड योजना
8)फळबाग लागवड योजना
9)महाडिबीटी व कृषी यांत्रिकीकरण योजना
10)नविन मतदार नोदंणी व मयत व दुबार नाव वगळणे बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
1) मंडल कृषी अधिकारी बरड अशोक नाळे साहेब यांनी मानवी आहारात ज्वारी बाजरी नाचणी अन्न धान्य महत्व व कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग व महत्व बाबत मार्गदर्शन केले.
2)कृषी पर्यवेक्षक बरड दत्तात्रय एकळ यांनी रब्बी हंगामातील हंगाम एक रूपयात पिक विमा योजना व कृषी विभागाच्या फळबाग लागवड, ठिबक सिंचन, महाडिबीटी योजना व विविध योजना बाबत मार्गदर्शन केले.
3)कृषी सहाय्यक मिरढे संजय करचे यांनी मागेल त्याला शेततळे योजना बाबत मार्गदर्शन केले.
4) कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर यांनी शेतीशाळा प्रवर्तक म्हणून शेतीशाळा आयोजन व सुत्र संचालन केले पी.एम किसान योजना , पाचट अच्छादन व्यवस्थापन चारा व्यवस्थापन , बांबु लागवड योजना , पांडुरंग फुंडकर फळबाग , लागवड योजना बाबत मार्गदर्शन केले.
शिवार फेरी अंतर्गत राजेंद्र हरिचंद्र राऊत गावठाण यांच्या ठिबक सिंचन वरिल ज्वारी प्लॉट व संदिप राऊत जुना मला याचे उत्कृष्ट ज्वारी प्लॉट ला शास्त्रज्ञ सल्ला व भेट देण्यात आली.
तसेच नविन मतदार नोदंणी व मयत व दुबार नाव वगळणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.10 नविन मतदार नाव नोदंणी फोर्म स्वीकारण्यात आले.
या वेळी उपस्थित शेतकरी मित्रांना डायरी, पेन उपहार पोहे व चहा देण्यात आला. या वेळी आंदरुड गावच्या सरपंच माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य , प्रगतशील शेतकरीवर्ग व 45 शेतकरी उपस्थितीत राहुन विविध योजना बाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमा वेळी उपस्थित शेतकरीवर्ग व कृषी विभागातील अधिकारी याचे प्रगतशील शेतकरी धनाजी सावळा राऊत यांनी आभार मानले.