हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

समाजातील गरजु – ऊपेक्षित महिलांना साड्या वाटप हा संगिनि फोरमचा स्तुत्य ऊपक्रम – शिवलाल गावडे

(फलटण/प्रतिनिधी)-सामाजीक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या संगिनि फोरम,फलटण कडुन फलटण बस स्थानका बळीवर स्वच्छतेचे कार्य करीत असलेल्या महिला तसेच समाजातील गरजु – ऊपेक्षित महिलांना साडी व दीवाळी फराळ वाटप करण्यात आले , यावेळी फलटण बस स्थानकावरील कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे सर बोलत होते.सामजिक बांधीलकी म्हणुन संगिनि फोरम ने केलेल्या कार्याचा सर्वांनी आदर्श घेतला पाहीजे व ऊपेक्षितांना मदत केली पाहिजे असे नमुद केले.

संगीनी अध्यक्षा अपर्णा जैन यांनी प्रास्ताविकात संगीनी फोरमच्या कार्याबद्दल विर्स्तुत माहीती दिली. यावेळी संगिनि फोरम अध्यक्षां अपर्णा जैन,सहाय्यक वाहतुक निरीक्षक सुखदेव अहिवळे,धिरज आहिवळे, जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष रार्जेंद्र कोठारी,ऊपाध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनि फोरम च्या सचिव प्रज्ञा दोशी,खजिनदार मनिषा घडिया,ऊपाध्यक्षां मनिषा व्होरा,माजी अध्यक्षां निना कोठारी , माजी सचिव पोर्णिमा शहा,संचालिका सारीका दोशी,सदस्या संध्या महाजन,सुरेखा ऊपाध्ये,सारीका सचिन दोशी उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगिनि सदस्यांनी परिश्रम घेतले. खजिनदार मनिषा घडिया यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!