हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

माणच्या दुष्काळी सवलती वर सधन तालुक्याच्या उड्या

दुष्काळी माण तालुक्यातील १३ तलावा पैकी १० तलाव कोरडे पडले आहेत ३ तलावात हि मृत साठा शिल्लक माण मध्ये ४२ टॅंकरने ८५ खेपा, ४९ हजार ३४४ नागरीकांना, व ५५ हजार १४० जनावरांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

 

माण तालुक्यातील दुष्काळी भागातील चित्र( सरतापे एल के सरतापे/ म्हसवड) : – पिढ्यान पिढ्या पाचवीला पुजलेली दुष्काळाने पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची, अन्नधान्याची, जनावरांच्या चाऱ्याची, ऊस तोडणी, रंग काम , माती काम व मेंढरे घेऊन घरांना कुलपे लावून तर काही मेढपाळ वृध्द माता पिढ्यांना व शालेय मुलांना त्यांचा संभाळ करण्यासाठी ठेवून नऊ नऊ महिने पाटणखोरे, कोल्हापूर सांगली सोलापूर आदी भागात शेकडोहुन अधिक मेंढपाळ बायकामुलासह मेंढरे चारण्यासाठी घेऊन जातात बारा हि महिने उन्हाळ्या, पावसाळ्या व हिवाळ्यासह आज हि ४५ टॅकरने माणची तहान भागवली जाते दिपावलीची आंघोळ हि टँकरच्या पाण्याने करणार्या दुष्काळी माणच्या सवलतीवर साखर कारखानदार, सुतगिरणीवाले, दिवस रात पाण्याचे कॅनॅल वाहणारे , एम आय डी सी सह आदी उद्योग असणाऱ्या एक तरी गावात टँकर सुरू आहे का , चारा टंचाई आहे का , का रोजगाराची चनचन, सर्व काही आबादी आबाद असताना दुष्काळी यादीत येवून माणच्या दुष्काळी सवलतीवर उड्या मारण्याची स्पर्धा सातारा, पाटण महाबळेश्वर, जावली, कराड, वाई, खंडाळा फलटण कोरेगांवची नेते मंडळी का करत आहेत माणची नेते मंडळी काय झोपा काढत बसली आहे का, नेहमी एकमेकावर पातळी सोडून गरळ ऐकणारे नेते व नेत्यांची पिल्लावळ काय करत आहे असा सवाल माणवासीय करत आहेत.

 

माण तालुक्यात पाऊस नसल्याने जनावरांना ओला चार तालुक्यात दुसऱ्या शेजारी माळशिरस, आटपाडी, सांगोला, फलटण आदी ठिकाणावरुन चारा शेतकरी आणुन घालणे बळीराजाला परवडत नसल्याने व आगामी आठ ते नऊ महिन्यांत अत्यंत बिकट परिस्थिती बळीराजा समोर उभी राहणार असल्याने जनावरे बाजारात मिळेल त्या दरात विकल्या शिवाय पर्याय नाही कारण
ओली मका २००० हजार रुपये गुंठा, किरळ्याची (कणसाची) मका २५०० शेकडा,१० ताटाची मकवान पेंढी २० रुपये, १० ताटाचा पाचूंदा ऊस २५ रुपये, २५०० हजार रुपये ऊस गुंठा, खपरी पेंड ३२०० रुपये, गोळी पेंड १६०० रुपये तर भरडा १३०० रुपये दर

पावसाचे आगर असलेल्या सातारा जिल्ह्यातील सात ते आठ तालुके महाराष्ट्र परिचित आहेत त्याच सातारा जिल्ह्यात दुसऱ्या बाजूला कायम पाणी चारा अन्नधान्य व रोजगार याचा दुष्काळ असलेले माण खटाव फलटणचा काही भाग, कोरेगांवचा काही भाग हे कायम दुष्काळी चटके सोसणारे तालुके टँकरने पाणी पिणारे म्हणून महाराष्ट्रात परिचित आसताना या कायम दुष्काळी तालुक्यांना दुष्काळी यादीतून डावलून पावसाचे आगर असणारे, एक हि गाव टँकरच्या पाण्यावर नसताना , ना चारा ना रोजगाराची कमतरता अशी सदन तालुके म्हणून ओळखला जाणारा वाई, खंडाळा या तालुक्यांना दुष्काळी यादीत समावेश करुन दुष्काळी जनतेची खरी चेष्टा सरकार करतय , महा मदत सर्वे करतोय, कि राजकारणी मंडळी करतय का अधिकारी करतात नक्की कोणाला दुष्काळी तालुक्याच्या हि सवलती हव्या आहेत आज पर्यंत दुष्काळी तालुके म्हणून सतत सोई सवलती पासून सवतीच्या मुला प्रमाणे दुष्काळी भागाला वागणूक देवून रोजगार पळवले, आमच्या हक्काचे पाणी पळवले, कारखाने पळवले व या भागातील माणसे मात्र ऊस तोडणी, रोजगारासाठी जनावरे चारण्यासाठी, रंग कामासाठी व माती कामाला राबवून घेत चांगल्या सोई सुविधा सर्व गरजा भागविल्या व दुष्काळी तालुक्याला दुष्काळाच्या सोई सुविधा काही दिल्या काही शासना कडून आल्यानंतर म्हणून आज पर्यंत झुलवत ठेवले आता तर माण दुष्काळी नाही म्हणून जाहीर करून पावसाचे आगर असलेले दुष्काळी तालुके जाहीर होताच दुष्काळी तालुक्यातील नेते मंडळी खडबडून जागे झाले व निवेदनावर निवेदने देवून आम्ही किती दुष्काळी जनतेच्या मागे आहे हे दाखवण्याची चढाओढ लागली होती महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यातील जनतेचा रोष व लोकप्रतिनिधी यांची निवेदनाच्या आधारे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तातडीची बैठक घेऊन महाराष्ट्रातील उर्वरित दुष्काळ यादी जाहिर करताना सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यात एक हि गाव टँकरच्या पाण्यावर नसणारे, विहीर ,तलाव, बंधारे, धरणे, नदी, ओढे व कॅनाॅल दिवस रात्र भर भरुन वाहणारी गावे, चारा कधी हि विकत न घेतलेली गावे , रोजगाराची गावातच लहान मोठे लघुउद्योग, एम आय डी सी ची साधने आसलेले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे आगर असलेल्या वाई व खंडाळा ह्या दोन दुष्काळी तालुक्या बरोबर आता सातारा, जावली, पाटण, कराड, वाई, खंडाळा,हे आठ तालुके दुष्काळी जाहीर करून खरर्या दुष्काळी माण खटाव बरोबर फलटण, कोरेगांव या चार तालुक्यावर अन्याय इतर आठ तालुके दुष्काळी जाहीर करून केंद्र व राज्याच्या मिळणार्या निधीत वाटणी घालण्याचे काम सधन आसलेल्या
१० दुष्काळी तालुक्यातील एकुण ९२ मंडलातील तब्बल ७४ मंडले दुष्काळी जाहिर केली सधन असलेल्या दुष्काळी तालुक्यातील नेत्यांनी जे उर्वरित १७ मंडले दुष्काळी परिस्थितीत नसल्याने त्यांना वगळून त्याचेवर हि एकप्रकारे अन्याय केला आहे आसो दुष्काळी तालुके म्हणून सातारा, जावली, पाटण, कराड, वाई, खंडाळा या सहा तालुक्यात कडाक्याचा दुष्काळ आहे प्रत्येक तालुक्यात ४० ते ५० टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे, जनावरांना चारा नाही, जनावरांना पाणी नाही, जगासाठी जनावरे घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते, रोजगारासाठी मुंबई पुण्यला जावे लागते अशी अवस्था या सहा तालुक्याची असल्याने व या दुष्काळी तालुक्यांच्या पालकमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार या मंडळीचा राजकीय वरहस्त व या भागातील कृषी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला दुष्काळी सर्वे मुळे हे सधन असलेले तालुके दुष्काळाच्या यादीत समावेश करुन सधन असलेल्या भागात आणखीन दुष्काळी सवलती नेहुन या भागाचे नंदन वन करुन खरे दुष्काळी तालुक्याच्या सवलती व निधीत हि वाटणी घालून माण खटाव दुष्काळी तालुके मदतीपासून वंचित राहणार आहेत.ह्याला नक्की जबाबदार कोण असा सवाल दुष्काळी जनता करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!