(अजिंक्य आढाव/ जावली )दुधेबावी फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी दुतानी नुकतेच शेतकऱ्यांना मधमाशी पालन बद्दलचे प्रशिक्षण दिले प्रशिक्षणामध्ये मधमाशी पेटी व माहिती तक्ते यांचा द्वारे कृषी दुत्यांनी मधमाशी पालन व उपयोग सांगितले मधमाशांमुळे फुलांचा रस पराग यांचा सदुपयोग होतो आर्थिक प्राप्ती मिळते रोजगाराचा देखील प्रश्न मिटतो शुद्ध मधाचे मेणाचे व इतर आधारित वस्तूंचे उत्पादन मिळते मधमाशी पालन कोणत्याही इतर जास्तीच्या खर्चाशिवाय शेताच्या बांधावर किंवा शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो.
शेतातील भाजी फुलांच्या उत्पादनात संवाद दीडपटीने वाढ होते कारण मधमाशा ह्या परागीकरणाचे काम उत्तमरीत्या करतात तसेच मधाच्या सेवनाने मानवाच्या आरोग्य उत्तम राहते ते एका प्राकृतिक औषधाचे काम करते मधाच्या सेवनाने अनेक रोग होत नाही रक्तदाब लट्टपणा आदी रोगांना फायदा होतो मधा मधमाशी पालनात फार कमी खर्च लागतो व तुलनेत वेळ पण कमी लागतो तसेच कमी जागेत पर्यावरण पूरक हा एक व्यवसाय ठरू शकतो अशी विद्यार्थी कडून माहिती मिळाली शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु डी चव्हाण श्रीमंत शिवाजी राजे उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी निंबाळकर कार्यक्रम समन्वयक नीलिमा धालपे कार्यक्रम अधिकारी प्रा स्वप्निल लाळगे व नितिषा पंडित व विषय विशेषज्ञ प्रा निशिकांत यादव यांचे अमुलाग्र मार्गदर्शन लाभल्याचे कृषीदूत राजवर्धन दराडे संकेत तावरे यश भोसले दिग्विजय फाळके रोहित शिंदे शिवम मेनकुदळे यांनी सांगितले