(अजिंक्य आढाव/जावली) तडवळे ता.फलटण येथील शौर्य श्याम गायकवाड इयत्ता आठवी मधे शालेय शिक्षण घेत असलेला विद्यार्थी याने आपल्या बोटाच्या चतुराईने टायपिंग स्पीड ने भारतातला नव्हे तर जगातील विक्रम मोडण्याची किमया केली आहे.
या विक्रमा बद्दल त्याच्या सहकुटुंब सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याने आपल्या टायपिंग मद्ये स्पीड 2.94 सेकंदात A to Z alphabet टायपिंग करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली सामान्य कुटुंबातील मुलाने एक नवीनच किमया करुन दाखवली या किमयेच्या पाठी त्याचे आई वडील आणि शिक्षण यांचा सिंहाचा वाटा आहे.
शौर्य च कौतुक करावं तेवढं कमीच अश्या होतकुरू मुलांचा आदर्श बाकीच्या मुलांनीही घ्यावा आणि आपल्या आई वडील व देशाचे नाव मोठे करावे अश्या कौतुकास्पद मुलांनच्या कौतुकासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सदैव मदत कार्यात सहभागी राहील असे सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ , राष्ट्रीय समाज पक्ष तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ, मनोज खराडे ,वैभव राज नरुटे, गोरख सुळ,रणजित कुलाळ आदी मान्यवर उपस्थित होते