हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

शिखर शिंगणापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणखी किती दिवस वाट बघावी लागणार ..?

लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ; वाहनं चालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप..!

गेले अनेक वर्षांपासून हा रस्ता व्हावा यासाठी दोन वेळा निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला होता आठ दिवसात काम सुरू करतो म्हणून अधिकारी जातात ते माघारी येत नाहीत आत्ता मात्र शांत बसणार नाही एक महिन्याच्या आत या रस्त्रस्त्याचे काम सुरू केले नाही तर २५ आॅक्टोबर २०२३ रोजी शिंगणापूर चौक या ठिकाणी या रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा -श्री बबनदादा विरकर -उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय समाज पक्ष

(म्हसवड/ प्रतिनिधी) म्हसवड ते काटकर वस्ती वरकुटे-म्हसवड (शिंगणापूर रोड) हा  ६ किलोमीटर अंतराचा रस्ता गेले अनेक वर्षापासून अत्यंत धोकादायक बनला असून या रस्त्यासाठी आज पर्यंत डझनाहुन आंदोलनाची निवेदने देवून हि माण तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नाही बाधकाम विभागाच्या नावाने काल अखेर ४५ वर्षीय महिलेचा पाचवा बळी या खड्डेमय रस्त्याने घेतला असून आजून सार्वजनिक बांधकाम विभागाला व तालुक्याच्या आमदार, खासदार, नगर पालिका प्रशासनास किती बळी दिल्यावर या रस्त्याचे पांग फिटणार ,दुरुस्ती नको मजबुतीकरण व डांबरी/कारपेट टाकुन नविन रस्ता फक्त ६ किलोमीटरचा टप्पा दुरुस्ती होणार का म्हसवड शिंगणापूर रोडवरील पालिका हद्दीतील सहा किलोमीटर अंतराचा रस्ता हा पालिकेच्या हद्दीत येतो या रस्त्यावरून ढाले मामा वस्ती, खंदारे वस्ती, फुटाणे मळा, सावता माळी नगर, महात्मा फुले नगर महादेव मळा, सराटे वस्ती, शेंबडे वस्ती व लिंगे मळा हि म्हसवड पालिका हद्दीतील नागरीक जवळ जवळ अडीच ते तीन हजार म्हणजे एक वाॅर्ड या रस्त्यावरून रोज येजा करतो तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून हि शिंगणापूर देवालयात भाविक जात असतात त्याच प्रमाणे मार्डी, माळी खोरा, रांजणी, माळवाडी, वरकुटे म्हसवड, वाकी, काटकर वस्तीवरील नागरीकांना म्हसवड हि तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने म्हसवडला खरेदीला यावे लागते या मार्गाशिवाय दुसरा पर्यायी रस्ताच नाही या रस्त्याने जाताना दोन ते अडीच फुटाचे खड्डे पडले असून आठ फुट रुंद असलेला हा रस्ता आज केवळ चार फुटाचा म्हणजे एक वाहन हि जाऊ शकणार नाही एवढा रस्ता उरला आहे तो हि खड्ड्यातील भरला असून अनेकवेळा चारचाकी वाहने व दुचाकी गाड्या या खड्डयांमध्ये आदळून नुकसान होत आहे. स्थानिक नागरिक, व्यावसायिक व तसेच परिसरात राहणा-या हजारो जणांना या खड्डेमय रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या रस्त्याच्या साईडपट्टया गेल्या दहा वर्षात भरल्या नसल्याने डांबरीकरण केलेला भाग व साईडपट्टी यामध्ये अनेकठिकाणी एक फुटापर्यंतचे अंतर पडले आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहणे घसरुन दररोज अपघात होत आहेत. यामुळे प्रवाशांच्या हातपाय मोडण्याबरोबरच डोक्याला मार लागण्यामुळे अनेक प्रवास जायबंदी होत आहेत. वाहणांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. समोरून येणा-या वाहणांना बाजू देण्यावरुन वाहनचालकां मध्ये भांडणेही होत आहेत. अनेकवेळा या रस्त्यावर स्वताच्याच वाहनाचे अपघात होऊन पाच जगाचे बळी गेले आहेत तर लहाणमोठे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत.म्हसवड ते वरकुटे-म्हसवड पर्यंतच्या रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याने प्रवास करणे कठीण बनले आहे. या मार्गाने मार्डी, शिंगणापुर, फलटण, नातेपुते ,मुंबई , पनवेल, ठाणे, बारामती, सांगोला पूणे,म्हसवड फलटण व म्हसवड दहिवडी आदी दहा ते पंधरा बसेस या मार्गावरुन धावत होत्या मात्र रस्ता खराब असल्याने सकाळी शिंगणापूर बस व रात्री सात वाजता मुंबई अवघ्या दोनच बसेस सुरू आहेत रस्ता खड्डेमय झाल्याने डेपो खराब रस्त्यावर वाहने पाठवत नसल्याने प्रवाशा बरोबर शालेय विद्यार्थ्यां ही वडापचा अधार घेताना दिसत आहे

सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुक्याचे प्रतिनिधी असलेल्या आ जयकुमार गोरे खा रणजितसिंह निंबाळकर, या भागातील जिल्हा परिषद सदस्य व म्हसवड पालिकेचे प्रशासन अधिकारी या रस्त्याकडे कोण लक्ष देणार आमदार म्हणून गोरे भाऊ यांनी या भागातील नागरिकांकडे दूर्लक्ष का केले तालुक्यात रस्त्याचे जाळे केले म्हणता मग म्हसवड हद्दीतील शिंगणापूर रोड, खडकी रोड, गंगोती रोड, वडजाई ओढा ते स्मशानभूमी रोड वर आज पर्यंत किती का केले नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे रस्ते पालिका हद्दीतुन जात असल्याने बांधकाम विभागाने पालिकेकडे तर पालिकेने बांधकाम विभागाकडे १० वर्षापासून बोटे दाखवून हे रस्ते करण्यास टाळाटाळ करत आहेत आजून किती बळी घेतल्या वर रस्ते करणार असा सवाल या भागातील मतदार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!