हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जावली ता. फलटण येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी

(जावली/अजिंक्य आढाव)आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आज जावली ता. फलटण येथील क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले .

क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली यावेळी महादेव मंदिरासमोर डीजे तालावर तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी (फोटो अजिंक्य आढाव जावली)

पेशवाई बुडाल्यानंतर देशावर इंग्राजांचे राज्य सुरु झाले. उमाजी नाईक यांनी याच इंग्रजी सत्तेविरोधात बंड पुकारले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला.असा इतिहास या वेळी सांगण्यात आला.

उमाजी नाईक तरुण मंडळ यांच्या वतीने जेवणाच आयोजन करण्यात आले व संध्याकाळी गावातुन मिरवणूक काढण्यात आली, मिरवणुकीत महिलाही सहभागी झाल्या होत्या.

यावेळी जेजुरी येथुन आणलेल्या ज्योत याचे पूजन केली, यावेळी पञकार राजकुमार गोफणे,ज्ञानदेव बुधावले, सचिन मकर, सोनबा पोकळे, पांडुरंग भंडलकर ,राजु मदने,आनंदा भंडलकर, गणेश मदने, दादा मदने, दादा बुधावले,दशरथ बुधावले आदी उमाजी तरुण मंडळ मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!