हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

आदंरुड ता.फलटण येथे पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जीवनदान

(जावली/अजिंक्य आढाव)सध्या फलटण पूर्व भागात पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नसुन वन्य प्राणी दिवसा व रात्री पाण्यासाठी भटकंती करताना आढळत आहेत.अशातच तहानलेल्या कोल्हा मौजे आंदरुड तालुका फलटण येथे श्री महादेव कर्णे यांच्या शेतामध्ये 50 फूट खोल कठडा नसलेल्या विहिरीत पडलेल्या अवस्थेत सापडला .वन विभागाचे अधिकारी राहुल निकम साहेब यांना माहिती मिळताच कोल्ह्याची सुटका करण्यात आली.

मौ . आदंरुड ता. फलटण येथील विहिरीत पडलेल्या अवस्थेत आढळला कोल्हा

या बाबतीत सविस्तर माहिती अशी की आंदरुड येथील श्री महादेव कर्णे यांच्या विहिरीमध्ये विहिरीला कठडा नसल्याने विहिरीमध्ये कोल्हा या जातीचा वन्य प्राणी पडलेला महादेव कर्णे यांना आढळला त्यानंतर त्यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधून वन विभागाला त्याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री दिगंबर जाधव व वनपाल श्री राजेंद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र अधिकारी श्री राहुल निकम आणि ग्लोबल अर्थ फाउंडेशन चे प्राणी मित्र श्री सचिन जाधव, मंगेश कर्वे हे त्वरित घटनास्थळी जाऊन त्यांनी त्या प्राण्याची सुटका करून त्याला कोणतीही इजा झाली नाही याची खात्री करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या कामी वन सेवक सत्यवान चव्हाण व बाळासो मदने यांची मोलाची मदत झाली.

यावेळी बोलताना फलटण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री दिगंबर जाधव यांनी असे वन्य प्राणी जखमी किंवा अडचणीच्या ठिकाणी आढळल्यास लोकांनी घाबरून न जाता त्वरित फलटण वन विभाग किंवा ग्लोबल अर्थ फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधावा असे या  वेळी सांगण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!