फलटण प्रतिनिधी – महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शेवंताबाई पवार वाचनालय ग्रंथालय साखरवाडी यांच्या वतीने आश्रम शाळेतील मुलींना गणेश वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महानंदाचे व्हॉइस चेअरमन तथा विद्यमान संचालक डि.के. पवार यांच्या यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येणाऱ्या शेवंताबाई पवार वाचनालय ग्रंथालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती महानंदाचे संचालक डी. के. पवार यांनी दिली.
याप्रसंगी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, यश मल्टीस्टेटचे डॉ. राऊत तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश भोसले, उपाध्यक्ष शैलेश इंगळे, तालुका जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. खानविलकर, चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजी भोसले, पंचायत समिती माजी सदस्य सागर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य हरीश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पवार, ज्येष्ठ पत्रकार किसन भोसले, हरीश गायकवाड, हनुमंत बोंद्रे, डॉ. आगा, रामभाऊ जगताप, श्री गणेश गायकवाड तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.