(जावली/अजिंक्य आढाव)- अभिमान अजित केसरकर बेळगुंदी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांनी सन 2024 मधे झालेल्या NEET परिक्षेत 720 पैकी 696गुण प्राप्त करत MBBS साठी पात्र ठरले. या बद्दल जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अतिशय नाजूक परिस्थितीतून आपल्या मुलांचे शिक्षण आई – वडीलांना पूर्ण केले यामुळे अभिमानच्या यशाचे श्रेय घरातील आई वडिलांना जाते, वडील उपमहाराष्ट्र केसरी कोल्हापुरच्या काळाईमाम तालमी घडले,काही काळानंतर पैलवान कि सुटल्याने कुटुंबावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली, परंतु कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन हार न मानता कुटुंबाला सावरायचे कसं असा प्रश्न निर्माण झाला,यातच आई व वडीलांचे निधन झाले,मुले १० व १२ चे शिक्षण पूर्ण करित होती.खडतर परिस्थिती कोणाताही आधार नसताना मुलांना उच्च शिक्षीत करण्याचं स्वप्न आई वडीलांनी ठरवलं, मुलांनीही ते आज साकार केले.मुलगी डॉक्टर कु.अरुंधती अजित केसरकर,मुलगा -अभिमान अजित केसरकर MBBS स्वप्न साकार केली.या बद्दल नातेवाईक, मित्र परिवार, कोल्हापूर काळाईमाम तालीम मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.