हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

माढ्याच्या निकालाचा चौकार रणजितसिंह निंबाळकर ठोकणार कि धैर्यशील मोहीते पाटील, एक्झिट पोलच्या निकालामुळे भाजपच्या गोठात शांतता, लोकसभेच्या निकालावर पाच विधानसभेची गणिते..?

(म्हसवड/ प्रतिनिधी)- पश्चिम महाराष्ट्रासह देशात गाजावाजा असलेला माढा लोकसभा निवडणुकीची चौथी लोकसभा निवडणुक होत असून या चौथ्या निवडणुकीचा चौकार दुसऱ्यांदा विजयश्री मिळवत रणजितसिंह निंबाळकर ठोकणार कि धैर्यशील मोहीते पाटील विजयश्रीचा चौकार ठिकाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे असले तरी बाजीगर कोण होणार हे काही तासात कळणार असले तरी या निकालामुळे उमेदवारा बरोबर कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले दिसत असून. प्रत्येक गावांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी धाकधूक पाहायला मिळत आहे.विविध चाईनचा एक्झिट पोल ,नेते व कार्यकर्ते वेगवेगळे अंदाज वर्तवत असल्याने माढा मतदारसंघातून दिल्ली दरबारी कोण माढ्याचा बाजीगर जाणार ? याचा फैसला आज दुपारपर्यंत लागणार असला तरी दोन्ही गटाकडून गुलाल आपलाच करा तयारी अशा सुचना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असल्या तरी कार्यकर्ते मात्र कोण जिंकणार याचीच मनोमन चर्चा करताना दिसत आहेत.

माढा लोकसभेची उमेदवारी भाजपाने रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर केल्यापासून माढा कधी नेत्यांची फोडा फोडी, नेते पळवापळवी, कोणाला चौकशीचा ससेमिरा मागे लावणे, गेल्या पाच वर्षात गावांमध्ये न फिरल्यामुळे खासदार यांचेवर लोकांची नाराजी पहायला मिळत होती. तर विकास कामाचे उमेदवारावर केलेले आरोप आणि त्यांनी त्या आरोपांचे उत्तर समोरच्या उमेदवाराकडून योग्य पद्धतीने न देता आल्यामुळ व विरोधी उमेदवार म्हणून पोलिस ठाण्यात जुने गुन्हे उकरून काढण्याचे प्रकार झाल्यामुळे च धैर्यशील मोहीते पाटील यांचे पारडे अधिक जड झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळेच धैर्यशील मोहीते पाटील विजयी होणार याबाबतच्या अनेक गावांत पैजा देखील काही कार्यकर्त्यांनी लावल्या असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सातारा सोलापूरकरां बरोबर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, सोलापुरातील रामवाडी गोडाऊनमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. मंगळवारी, सकाळी ८ पासून गोदाम, रामवाडी, ४३ माढा लोकसभा मतदार मतमोजणी प्रक्रिया शांततेत, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निर्भय व शांततेत पोलिस बंदोबस्त गोदाम, रामवाडी, सोलापूर येथे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता, १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय धान्य गोदाम, रामवाडी लगतचे १०० मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास, वाहनांचे आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यानुसार शासकीय धान्य गोदाम, रामवाडी येथील आतील संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅब्लेट, संगणक व तत्सम संदेशाची देवाण- घेवाण करणारी विद्युत उपकरणे आणण्यास, वापरण्यास, हाताळण्यास प्रतिबंध असणार आहे. तंबाखुजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्रही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणे, मतमोजणी केंद्राचे परिसरात निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्ती यांनी मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे, कोणत्याही प्रकारचे शत्र बाळगून मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे

१४ टेबलावर माढ्यासाठी २७ फेरीत मतमोजणी

माढा मतदारसंघासाठी करमाळा व माढा, सांगोला व माळशिरस, फलटण व माण हे एकाच हॉलमध्ये १४ टेबलवर मतमोजणी होईल. करमाळा २५, माढा २५, सांगोला २२, माळशिरस २५, फलटण २५ माण २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी जवळपास ४०० पर्यंत कर्मचाऱ्यांनी नेमणूक केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी १२ लाख ६७ हजार ५३० तर पोस्टल मतदान ६ हजार ९७१ एवढी मते मोजली जाणार आहे.

लोकसभेच्या प्रचारात विधानसभेचा प्रचार

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अटीतटीच्या व चुरशीची प्रचारात पक्ष फोडा फोडी, नेते फोडा फोडी, कार्यकर्ते फोडा फोडी, ब्लॅकमेलिंग, चौकशीचा ससेमिरा त्याच बरोबर साम दाम दंड भेद, दुष्काळी परिस्थितीत जनता पाण्यासाठी जनावरे चारा मिळत नाही म्हणून हंबरडा फोडत होती नेते पुढारी आमदार, खासदार व अधिकारी मात्र निवडणुकीच्या प्रचारात असल्याने पाच हि मतदारसंघातून नाराजीचा सुर निघत असुन निवडणूक लोकसभेची असताना मतदारसंघात गाव ना गाव, वाडी ना वाडी, वस्ती ना वस्ती ज्याला रस्ते नाहीत तरी मोटार सायकलवर कधी चालत जाऊन मतदारसंघात केलेला विकास, मतदारसंघात आणलेले पाणी, आंधळी धरणात आणलेले पाणी रस्ते आदी कामे केल्याचे छाती ठोकून सांगत होते त्यामुळे आजच्या लोकसभेच्या निकालावरून माढ्यातील माण, फलटण, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा या विधानसभेची गणिते ठरणार हे मात्र काळ्या दगडावरील पांढरी रेघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!