(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना यांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून , सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 04/06/2024 रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणांस सुचित करण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल दरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर सोशल मीडिया तसेच तत्सम एप्लीकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, रिलस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत.
तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only group admin असा बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोष्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
असे आवाहन सुनील महाडिक , पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे .