(फलटण /प्रतिनिधी)- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले अभिवादन श्रीमंत रामराजे म्हणतात की, कुशल प्रशासक, प्रजानिष्ठ राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरविले गेले आहे. प्रजेची उन्नती व विकास साधताना सामाजिक शांतता, समता, न्याय व स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांना अहिल्यादेवीने आपल्या प्रशासन व्यवस्थेत प्राधान्य दिले.
तसेच धार्मिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक आघाडीवर महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी आपले कर्तृत्व देशपातळीवर गाजवलेले आहे. म्हणूनच त्या भारतातील पहिल्या क्रांतिकारी, समाज सुधारक, महिला राज्यकर्त्या ठरतात स्त्री शिक्षणापासून ते समाजकारण व राजकारणात पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांना करावा लागलेला संघर्ष प्रेरणादायी आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन