हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ फलटणला युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

(फलटण /प्रतिनिधी) – “आजि सोनियाचा दिनुवर्षे अमृताचा घनु”  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ओवी प्रमाणे आजचा दिवस हा श्री. स्वामी समर्थ सेवा मंडळचा आनंदचा दिवस की, आतापर्यंत केलेल्या कार्यबदल हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी- कराड तसेच श्री. स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ राठीवडे यांच्या वतीने पहिला राष्ट्रीय युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२४ ने फलटण गजानन चौक येथे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाला सन्मानित करण्यात आले.

नुकताच हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्वामी विवेकानंदच्या तपभूमी कन्याकुमारी येथे संपन्न झाला यावेळी मा.श्री सुनिल कुमार ( अध्यक्ष स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी) , मा. श्री अंगिरसाजी, सुनिल पडतरे, गुरुदास मेस्त्री, इ. मान्यवर उपस्थित होते.

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ हे दरवर्षी श्री. स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन, पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. श्रीदत्त जयंती, गुरुपौर्णिमा उत्सव यास श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना अन्नदान देण्यात येते. रक्तदान शिबीर, गरीब व गरजू लोकांना वैद्यकीय मदत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य इत्यादी मदत केली जाते.

गेल्या पाच वर्षापासून श्री स्वामी समर्थ भाविकास फलटण ते अक्कलकोट पायीवारी सोहळा हा कार्यक्रम अविरत सुरू केलेला आहे. अशा विविध सामाजिक कार्यात हे मंडळ नेहमी अग्रेसर राहिले आहे. याची दखल घेऊन मंडळाला पहिला राष्ट्रीय युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.

हा सन्मान सौरभ बीचुकले, कुणाल वाघ, प्रसाद दळवी, संकेत चोरमले, प्रथमेश चोरमले, गौरव जाधव श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या पदाधिकारी यांनी स्वीकारला या पुरस्काराबद्दल फलटण शहरातील व तालुक्यातील विविध आध्यात्मिक संस्था आणि स्वामी भक्त यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!