ताज्या घडामोडी
राॅयल इंग्लिश स्कूल जावलीचा सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के निकाल
या वर्षी पासून विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची सोय ; उज्वल यशाची परंपरा कायम ठेवणार - प्रा.अमोल चवरे
( जावली/ अजिंक्य आढाव)- रॉयल इंग्लिश स्कूल जावली ता.फलटण सलग दुसऱ्या वर्षी एस एस सी च्या विद्यार्थ्यांची 100 % यशाची परंपरा परीक्षांमध्ये ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांनी घेतलेल्या एस . एस. सी. 2023/24 परीक्षेमध्ये जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल मधील उत्तीर्ण विद्यार्थी श्रुतिका दत्तात्रय गावडे 92.4 टक्के , गायत्री मनोहर कचरे 89.80 टक्के, तनुजा दिगंबर खुरंगे 89.20 टक्के, दिक्षा संतोष खुरंगे 85.20 टक्के
सोमनाथ कृष्णात आटोळे 78.60 टक्के पृथ्वीराज प्रवीण मोरे 74 टक्के , वैष्णवी रामदास चवरे 73.20 टक्के , ज्ञानेश्वर लक्ष्मण बरकडे 65 टक्के या यशा बद्दल अध्यक्ष श्री.दशरथ चवरे, अमोल चवरे सर राॅयल इंग्लिश स्कूल जावलीचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्गातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे, ह.भ.प.महाराज नवनाथ कोलवडकर यांनी या यशाबद्दल कौतुक केले