(जावली/अजिंक्य आढाव) सगुणामाता नगर फलटण येथे बंद घरातुन लॅपटॉप व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दि.22 मे रोजी सकाळी 10 ते 26 मे रोजी सकाळी 10 : 30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील 25 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व 10 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांने चोरुन नेल्याचे फिर्यादेत म्हटले आहे.
या घटनेबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.