हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून सख्ख्या बहिण भावाची हत्या ; फलटण पोलिसांनी दहा तासात लावला गुन्ह्याचा छडा

(फलटण/ प्रतिनिधी)- फलटण तालुक्यातील निंभोरे गावचे हद्दीत पालखी महामार्गावरील उड्डाणपूल असे झाले उड्डाणपूला सख्या बहिण भावाचा खून झाल्याने फलटण तालुक्यात खळबळ माजली होती. मात्र फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दहा तासात जेरबंद केले .

फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालखी महामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे 20 वर्ष व शीतल राम शिंदे उर्फ शितल रंगनाथ फाळके व उपस्थित दोघे सुंदरनगर निंबोरे ता फलटण यांचे मृत्यू रस्त्याच्या कडेला मिळून आल्यावर लागलीच पोलिसांनी घटनास्थळाची मागणी केली असता दोघांच्या छातीवर धारदार शस्त्राने भौकसल्याने त्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.सदर व्यक्ती घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती सख्ये भाऊ बहीण आहेत.त्या दोघांचे खुन अज्ञात व्यक्तीने केला म्हणून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.न.५२०/२०२४ भा.द.स कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची कामगिरी ओळखून समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा ऑचंल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा सुनील महाडिक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
निभोंरे ता.फलटण हे गाव पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावरील असुन सदर घटनेचे ठिकाणी देखील महामार्गावरील उड्डाणपूलाजवळ आहे.घटना स्थळावर काहीही धागेदोरे नसताना, पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहिती च्या आधारे तपास सुरू केल्यानंतर असे निष्पन्न झाले की, मयत स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हीने तिचा पहिला नवरा कनवऱ्या भिमऱ्या पवार रा.वाळवा .जि. सांगली यास सोडून देऊन रणजित मोहन फाळके मुळगाव सातारारोड ता. कोरेगाव जि.सातारा यांचे बरोबर तिच्या आईवडिलां‌सोबत झोपडी मधे राहत होता.सदरची घटना घडलेल्या रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडी मधे झोपला होता.परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्यांने तिथून पळ काढला पोलिसांनी त्यास सातारारोड ता. कोरेगाव येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपूस केली असता , त्याने सुरूवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दि. २५/०५/२०२४रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शीतल ही झोपेतून उठून पर पुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे,तो तो झोपडपट्टीतील चाकु घेऊन तिच्या मागोमाग गेला.काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाडुन तिच्या छातीवर चाकु खुपसून तिचा खून केला.त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो पर पुरुष आहे असे समजून त्याने त्याच्याही छातीत चाकु खुपसुन त्याचाही निघृन खुन केला आहे,आरोपी रणजीत मोहन फाळके वय ४५वर्ष यास अटक केली आहे.तपासामधे मयत बहीण भाऊ हे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित फाळके खुल्या प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अॅट्रसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे.

श्री समीर शेख पोलिस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राहुल धस उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री सुनिल महाडिक पोलिस निरीक्षक फलटण ग्रामीण, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, अशोक हुलगे , रोहित कर्णे , पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, मच्छिंद्र पाटील, गोपाल बदने, पोलिस अमंलदार मोहन हांगे, पांडुरंग हजारे, बबन साबळे, महादेव पिसे, संतोष सपकाळ, प्रविण फडतरे, अजित कर्णे, अरुण पाटील, शिवाजी मिसे , अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे , ओंकार यादव ,मोहन पवार, रोहित निकम , विशाल पवार,वैभव सावंत,केतन शिंदे, शिवाजी गुरव, अमृत करपे, वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, संदीप मदने, अमोल जगदाळे,विक्रम बनकर, श्रीनाथ कदम, अमोल पवार,संजय देशमुख, संभाजी साळुंखे,विक्रम कुंभार, हनुमंत दडस,रशिदा पठाण,प्रिती काकडे, उर्मिला पेंदाम, भाग्यश्री सुरुम , श्रीकांत खरात, अरुंधती कर्णे,शिवराज जाधव सदरची कारवाई केली आहे.

गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी राहुल धस साहेब करतं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!