क्रीडा व मनोरंजन
पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा मंगळवेढ्यात होणार तर कुमार गटाची लातूर व किशोर गटाची स्पर्धा मानवत(परभणी ): प्रा. डॉ. चंद्रजित जाधव
पुणे- (क्रीडा वृत्तसंस्था)-पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मंगळवेढा मध्ये सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या यजमान पदाखाली होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.
पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या शासकीय परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विविध स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले. याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा लातूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने तर किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मानवत (जिल्हा परभणी) या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धा साधारणपणे नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये होतील. या स्पर्धेच्या अगोदर राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात येतील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व फिजिओ यांची नियुक्ती सुध्दा जाहीर करण्यात आली आहे.
पंच शिबीर वसमत, हिंगोली
महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे पंच शिबीर वसमत (जिल्हा हिंगोली) या ठिकाणी ऑगस्टमध्ये आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये खो-खो मध्ये समाविष्ट होत असलेल्या व बदल झालेल्या विविध नियमांवर चर्चा होऊन उजळणी सुध्दा घेतेली जाते.