(जावली /अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील विशेषतः मिरढे, जावली आदंरुड या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.अशातच परिसरात जोरदार पाऊसाने झोडपले असले तरी पूर्व भागात अजूनही शेतकरी पाऊसाची वाट पाहत आहेत.
मागील वर्षीत जुन महिन्यात पाऊसे पडला मात्र पुढे जुलै ऑगस्ट या महिन्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्याने शेतपिकांचे उत्पादन कमी झाले.अशातच जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाण्यातची कमतरता भासू लागली.मिरढे , जावली,आदंरुड या शेतीला जोडधंदा म्हणून भागात दुग्ध उत्पादन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.या बरोबरच पोल्ट्री फार्मिंग, शेळी, मेंढ्या पालन व्यवसाय करतात.पण पाऊस नसल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही.
या भागातील शेती व शेतीपूरक व्यवसाय पाऊसावर अवलंबून आहेत.अद्यापही मौसमी पाऊस पुढे असुन शेतकरी पाऊसाची वाट पाहत आहेत.