हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

साखरवाडीतील सराईत गुंड मोन्या निभोंरेला पाठलाग करुन अटक

(जावली/ अजिंक्य आढाव)- साखरवाडी ता फलटण भागातील नामचीन गुंड मोन्या राकेश निभोंरे व 28 रा 7 सर्कल याचेवर शरीराविरुद्ध व मालमत्ते विरुद्धचे अनेक गुन्हे असल्याने व तो खुनाच्या गुन्ह्यातुन बाहेर आल्याने त्याची साखरवाडी भागात दहशत आहे.साखरवाडी पंचक्रोशीतील लोक त्याला घाबरतात.त्यामुळे त्याला फलटण ग्रामीण पोलिसांनी एक महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांचे आदेशान्वये सहा महिन्या करिता पुणे, सोलापूर, सातारा, जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

लोकसभा निवडणूक उद्या आहे.त्यामुळे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस हवालदार योगेश रणपिसे, अमोल जगदाळे,व बंदोबस्तासाठी प्रशिक्षणार्थी महिला पो.शी.अश्विनी बागडे भाग्यश्री पाटील, हे साखरवाडी भागात गस्त करताना,आज दि 6 मे रोजी तडीपार मोन्या निभोंरे व त्याचा साथीदार दत्ता सुरेश मोरे उर्फ दत्ता पावले राहणार सात सर्कल हे मोटारसायकल वरून जिंती होळ मार्गाने जाताना संध्याकाळी 6 वाजता त्यांना दिसले.

सदरचा गुंड तडीपार असल्याने त्याला थांबवण्याचा इशारा पोलिसांनी केला असता त्याने पोलिसांच्या गाडीवर लाथ मारली.पोलिसांना अपशब्द वापरुन पळू लागले.त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले.त्या ठिकाणावरुन दत्ता पावले पळून गेला सदर ठिकाणाहून पोलिसांनी ते चालवत असलेली मोटर सायकल क्रमांक MH 11AS 2711 हि पण जप्त केली .

मोन्या निभोंरे याला पोलिस ठाण्यात आणुन त्या दोघांवर भा.द.वी कलम 353.34सह तडीपार आदेश भंग केला म्हणून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे कारवाई केली सदर कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

निवडणूक काळात सर्व तडीपार लोकांची यादी प्रत्येक अधिकारी यांना देण्यात आली आहे मिळाल्यास त्यांना अटक करण्यात येणार आहे जनतेने न घाबरता माहिती द्यावी असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!