(म्हसवड /प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे माध्यमातून म्हसवड पालिका हद्दीत व शहर परिसरात भरभरुन अनेक महत्त्वाच्या कामांना निधी दिला विशेषतः म्हसवड पाणी योजने पासून पालिका इमारत रस्ते लाईटचे पोल नवीन डिपी आदी कामे राष्ट्रवादी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केली आहेत या केलेल्या कामाची उतराई महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कमळ या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन खांडेकर वस्ती येथील राष्ट्रवादीचे नेते डिपीडिसीचे सदस्य युवराज सुर्यवंशी यांनी केले
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी, मनसे , शेतकरी संघटना आदी महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे माण खटाव मधील नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उतरली असून आपन म्हसवड पालिका हद्दीत आमचे दैवत असलेले अजितदादा हे विकासाचे नेतृत्व असून आगामी काळात म्हसवड पालिका हद्दीत दादाच्या माध्यमातून पालिकेत वेगळा गट तयार करणार असून दादांना टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असे उच्चांकी मतदान रणजितसिंह निंबाळकर यांना करण्यासाठी दादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणजितसिंह निंबाळकर आ जयकुमार गोरे व मी एकत्र बैठक करुन उच्चांकी मताचा शब्द दिला आहे त्यानुसार ज्या भागात अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विकासाचे काम झाले झाले आहे त्या वाड्या वस्तीवर रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार दादा गटाकडून सुरू असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते व डिपीडिसीचे सदस्य युवराज सुर्यवंशी यांनी खांडेकर वस्ती, शिंदे वस्ती, काळा पट्टा, शेंबडेवस्ती आदी ठिकाणी बैठक घेण्यात आली