(एल के सरतापे/ म्हसवड)- देशात गाजत असलेला व देश पातळीवरील नेते मंडळीच्या होत असलेल्या जाहिर सभा मुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदार संघात भाजपाकडून माढा दुसऱ्यांदा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सुरुवातीपासून आपल्याच पक्षातील नाराजांची मनधरणी तर विविध पक्षातील नेते मंडळींना आपल्याकडे वळवून मतदार खेचण्यासाठी भाजपाने सर्व पर्यायाचा अवलंब करत अनेकांना विविध आश्वासनाची खैरात देत पंतप्रधान नरेंद्र मोदीं,केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अशी सात दिगज्ज केंद्रातील व राज्यातील भाजपा व सहगी पक्ष असलेले मंत्री माढ्याच्या रणमैदानात धुराळा उडवत आहेत तर दुसरीकडे मात्र ८३ वर्षाचा एकमेव योध्दा राष्ट्रवादी फुटी नंतर पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर सभा घेऊन भाजपाला सळो कि पळो करून सोडले आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे बनलेले लोकसभा मतदारसंघा पैकी सातारा, माढा, सोलापूर व बारामती या चार मतदारसंघाला वेगळे महत्त्व देशपातळीवर आल्याने हे मतदार संघ चर्चेचे बनले आहेत
भाजपासह सहयोगी पाच आमदारांची प्रतिष्ठापणाला
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा मधील पदाधिकारी यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध केला तर कधी भाजपाचा सहयोगी पक्ष असलेला राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे रामराजे यांचा काही ही झाले तरी प्रचार करणार नाही स्टेजवर जाणार नाही नसल्याचा निर्णय ,कधी उमेदवारी तु तु मै मै वरुन, कधी चक्क नेते पळवा पळवी वरुन, कधी पोलीस चौकशी तर कधी ईनकम टॅक्सच्या धाडीधाडी अशा वेग वेगळा कारणाने माढा गाजत ठेवण्याचे काम राजकारणी मंडळीनी केले
भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवला असून भाजपाचे आ गोरे सह आ शहाजीबापू पाटील, आ संजयमामा शिंदे, आ बबनदादा शिंदे, आ सुधाकर परिचारक यांची रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रतिष्ठापनाला लावून प्रचार करताना दिसत आहे
माढ्यात जातीच्या राजकारणाला थारा मिळणार का..? मराठा, धनगर व बौद्ध मतदार कोणता निर्णय घेणार..?
माढ्याच्या रणांगणात धनगर समाज, मराठा, ओबीसी व दलित कोणाच्या पारड्यात मताचा जोगवा टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी माढ्यातील बौद्ध समाज ,वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांना मतदान केले तर या दोन्ही दलित पक्षाचा एक हि उमेदवार विजया पर्यंत जाऊ शकत नाही कारण बौद्ध समाज्याच्या मताचे विभाजन आरपीआय आठवले गट एकीकडे करुन समाज भाजपाकडे घेऊन जात आहे जाणार किती हा जरी प्रश्न असला तरी काही प्रमाणात भाजपाला मतदान करणार एवढे मात्र खरे आहे बहुजन समाज पार्टीने महाराष्ट्रात अनेक वर्षे पाय ठेवले मात्र आजून मजबूत झालेली दिसत नाही यावेळी बहुजन समाज पक्षाने धनगर समाजाचे महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांना उमेदवारी देवून बौध्दासह धनगर समाज्याच्या मताची विभागणी करण्याचा डाव टाकला आहे स्वरूप जानकर हे एक मुरब्बी पत्रकार आहेत ते किती मते घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे तर वंचित बहुजन पक्षाने गत वेळी एक लाख मते घेतली होती त्या आधिच्या निवडणुकीत वंचित उमेदवार ८० हजारा पर्यंत गेला होता यावेळी वंचितने राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष बावसकर यांना वंचित मध्ये घेत त्यांना उमेदवारी दिली आहे माढ्यातील बौद्ध समाज वंचित सोबत किती राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धनगर समाजाचे या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात वर्चस्व असले तरी हा समाज एकसंघ किती हा हि प्रश्न आहे धनगर समाजाला माढ्यातील उमेदवारी राष्ट्रवादीने दिली असताना जानकरांनी परभणीची उमेदवारी का घेतली हा हि प्रश्न समाजाला पडला आहे म्हसवड येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी १७ दिवस अमरण उपोषण चार युवकांनी धरले होते त्या आंदोलनाला समाजातील आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, असो वा आमदार राम शिंदे हे तिघे हि भाजपा सोबत असताना एका हि आमदारांनी भेट या समाज्याच्या आरक्षणाच्या मागणीला का दिली नाही त्यामुळे समाज नाराज झाला असला तरी माणसप रासपासह भाजपाचे समाजाचे नेते मात्र परभणीत प्रचारासाठी रणरणत्या उन्हात फिरताना दिसत होते परभणीच्या प्रचाराचा धुराळा बसतो न बसतो तोच रासपानेते माढ्यात प्रचाराच्या जोर बैठका सुरू केल्या आहेत तर माळशिरस तालुक्यातील धनगर समाज्याचे नेते उत्तम जानकर यांनी मागील निवडणुकीत निंबाळकर यांच्या पारड्यात दिड लाखाच्या मताचा गठ्ठा टाकला होता ते जानकर आता मोहिते पाटील यांच्या बरोबर असल्याने मोहिते पाटील यांच्या पारड्यात किती मताचा गठ्ठा टाकणार याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे मराठा समाज धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करणार की रणजितसिंह निंबाळकर यांना मतदान करणार मराठा आरक्षणासाठी समाज्या बरोबर या दोन उमेदवारा पैकी कोण आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झाले होते कोणी मदत केली होती त्याच्या पारड्यात मराठा समाज मते टाकणार का याकडे लक्ष लागले आहे.
या मतदारसंघातील महत्त्वाचा घटन असलेला ओबीसी मतदार कोणती भूमिका घेणार ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या यलगार आंदोलनामुळे आरक्षणाचा प्रश्न पेटला होता तो ओबीसी कोणाच्या पारड्यात मते टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
एकुणच या मतदार संघातील धनगर, मराठा, बौद्ध व ओबीसी मतदार त्यांचेकडे जाणार तोच उमेदवार विजयश्री खेचणार असला तरी वंचित कोणाच्या विजयाची गेम पलटवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
भाजपाचे दोन म्हसवड येथील दलित नेते वंचितांच्या प्रचारात नक्की गेम काय..?
म्हसवड येथील एक मुस्लिम समाजाचे नेते म्हणून परिचित असलेले व भाजपा बरोबर गेलेले जिल्ह्याचे भाजप अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व दुसरे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले हे दोघे भाजपाचे आ जयकुमार गोरे यांचेबरोबर असलेले सध्या माढा लोकसभा मतदारसंघातील बौद्ध व मुस्लिम वसाहतीत जाऊन समाजा मोदींनी राबवलेल्या योजनेचा माहिती देत आहेत त्या ठिकाणी विरोध केला तर मात्र तुम्ही भाजपला मत देणार नसाल तर राष्ट्रवादीला हि देऊ नका तुमचे मत वंचित ला द्या असे हे दोघे बौद्ध व मुस्लिम नेते माढ्या सांगताना दिसत आहे त्यांचा नक्की गेम काय, नक्की भाजपाचे पदाधिकारी कि वंचित चे हे दोघे पट्टे..?