(जावली/ अजिंक्य आढाव)- 8 वर्षा पूर्वी राजाळे परिसरात खून झाला होता गुन्हा ७९/१६ कलम ३०२,१४३,१४५,१४७ १४९ यातील तीन आरोपी अटक झाले होते पण बाकी २ आरोपी फिरस्ते असलेमुळे मिळून येत नव्हते पोलिसांनी अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु प्रतेक वेळी ते पोलिसांचे हातावर तुरी देऊन पळून जात होते.
सदर आरोपी दत्त्या बिस्कुट्या भोसले वय ४५ रा राजाळे वैशी उर्फ राजश्री दत्या भोसले वय ४० यात्रेनिमित राजाळे येथे आले असलेची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली त्यानी तत्काळ पीएसआय गोपाळ बदाने, नितीन चातुरे ,अमोल जगदाळे ,तात्या कदम, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी महिला पोलिस कर्णे यांना पाठवून आरोपी यांना राजाळे येथून ताब्यात घेऊन अटक केली.
निवडणूक काळात प्रत्येक फरार आरोपी अटक करा .या बाबत मा पोलिस अशिक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी आदेश दिले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक फरार आरोपी अटक करण्यात येत आहे.
केस कितीही जुनी असली तरी फरार आरोपी रेकॉर्ड त्याला चिकटले जाते आणि कधी तरी त्याला अटक व्हावेच लागते
निवडणुक जाहीर झाल्यापासून फलटण ग्रामीण पोलिसांनी ५ फरार अटक केले आहेत.